फिट झाल्यानंतर फरदीन खानने पापाराझींना फोटो काढण्यास दिला नकार, हे आहे कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 05:10 PM2021-03-25T17:10:49+5:302021-03-25T17:15:05+5:30

फरदीन दिसताच प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यांनी त्याचे फोटो काढण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी फोटो काढण्यास फरदीनने नकार दिला.

Fardeen Khan refuses to pose for the paparazzi, asks 'What picture will you take with a mask? | फिट झाल्यानंतर फरदीन खानने पापाराझींना फोटो काढण्यास दिला नकार, हे आहे कारण

फिट झाल्यानंतर फरदीन खानने पापाराझींना फोटो काढण्यास दिला नकार, हे आहे कारण

googlenewsNext
ठळक मुद्देफरदीनने फोटो काढण्यास नकार देण्यामागे एक खास कारण होते.

फरदीन खानने त्याचे कित्येक किलो वजन कमी केले असून त्याचा नवीन लूक नुकताच पाहायला मिळाला. सेलिब्रेटी हेअर स्टायलिस्ट आलीम हाकीमच्या सलून बाहेर त्याला नुकतेच पाहाण्यात आले. फरदीन दिसताच प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यांनी त्याचे फोटो काढण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी फोटो काढण्यास फरदीनने नकार दिला. 

फरदीनने फोटो काढण्यास नकार देण्यामागे एक खास कारण होते. फरदीनने तोंडाला मास्क लावलेला होता. त्यामुळे फोटोग्राफरला विनंती करून त्याने सांगितले की, मी मास्क घातला आहे. मास्कसोबत माझे फोटो कसे येतील... असे म्हणत त्याने उपस्थित असलेल्या लोकांचे आभार मानले आणि तो गाडीत बसून निघून गेला. 

फरदीनचा चेहरा फोटोग्राफर्सनी काढलेल्या फोटोत आपल्याला व्यवस्थित दिसला नसला तरी त्याचा नवा लूक त्याच्या फॅन्सना आलीम हाकीमने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोत पाहायला मिळाला. 

काही वर्षांपूर्वी फरदीनचे वजन खूप वाढले होते. वयापेक्षा तो अधिक म्हातारा दिसू लागला होता. यावरून लोकांनी त्याला ट्रोलही केले होते. अलीकडे एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत फरदीनने यावर भाष्य केले होते. त्याने सांगितले होते की, ‘वजन वाढले होते. म्हणायला मी चाळीशीत होतो, पण जणू मी 70 वर्षांचा झालो आहे, असे मला वाटू लागले होते. थोडे चाललो तरी धाप लागायची. लोकांच्या नजरा मला छळायच्या. घराबाहेर पडलो तरी लोक मला चिडवत असल्याचे वाटायचे. पण एक दिवस यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि जिममध्ये ट्रेनिंग सुरू केली. वजन कमी करायचेच, हाच एक ध्यास बाळगला आणि 35 किलो वजन कमी केले.

 

1998 साली ‘प्रेम अगन’ या चित्रपटाद्वारे फरदीनने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. फरदीनच्या वडिलांनी म्हणजे फिरोज खान यांनीच हा चित्रपट प्रोड्यूस केला होता. पण हा चित्रपट दणकून आपटला. अगदी पदार्पणालाच फरदीनच्या वाट्याला फ्लॉप सिनेमा आला. यानंतर यशाची चव चाखायला त्याला 2000 सालची वाट पाहावी लागली. 2000 साली रिलीज झालेल्या ‘जंगल’ या सिनेमाने फरदीनला ओळख दिली. या चित्रपटातील फरदीनच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले. बॉक्स ऑफिसवरही हा सिनेमा हिट झाला. पण यानंतर 2001 साल उगवता उगवता फरदीन एका वादात सापडला.

2001 साली फरदीनला कोकेन खरेदी करताना रंगेहात पकडले गेले. यानंतर त्याला अटकही झाली. पाठोपाठ रिहॅब सेंटरमध्ये त्याची रवानगी झाली. या प्रकरणाने अनेक वर्षे फरदीनचा पाठपुरावा केला. अखेर 2012 साली त्याची या प्रकरणातून निर्दोष सुटका झाली.

लव्ह के लिए कुछ भी करेगा, ओम जय जगदीश, हे बेबी, ऑल द बेस्ट, प्यार तूने क्या किया अशा अनेक सिनेमात फरदीनने काम केले. पण अचानक का कुणास ठाऊक त्याने चित्रपटांतून ब्रेक घेतला. यानंतर अनेक वर्षे तो बॉलिवूडमधून गायब झाला.


 

Web Title: Fardeen Khan refuses to pose for the paparazzi, asks 'What picture will you take with a mask?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.