fans reguest arbaaz khan to get salman khan and katrina kaif married | प्लीज, भाईजान की शादी करा दो! ‘भारत’चा ट्रेलर पाहून चाहते झालेत क्रेजी!!  
प्लीज, भाईजान की शादी करा दो! ‘भारत’चा ट्रेलर पाहून चाहते झालेत क्रेजी!!  

ठळक मुद्दे कधी काळी सलमान व कॅटच्या रिअल लाईफ रोमान्सच्या बातम्या चर्चेत होत्या. पण अचानक या दोघांत रणबीर कपूरची एन्ट्री झाली .

सलमान खान आणि कतरीना कैफ यांच्या काय आहे, हे ठाऊक नाही. पण जे काही आहे ते खास आहे, इतके मात्र नक्की. सलमान व कतरीना दोघेही एकमेकांना मानतात. दोघांत एक खास बॉन्डिंग आहे. अलीकडे   ‘भारत’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि हा ट्रेलर पाहिल्यानंतर सलमान व कतरीनाच्या बॉन्डिंगची चर्चा सोशल मीडियावर रंगली. दोघांची पडद्यावरची केमिस्ट्री पाहून चाहते इतके उत्साहित झालेत की, त्यांनी थेट अरबाज खानला सलमान व कतरीनाचे लग्न करून द्या, अशी विनंती केली.
अनेकांनी अरबाजला टॅग करत, ‘अरबाज भाई, प्लीज सलमान और कतरीना की  की शादी करा दो,’ अशी गळ घातली. ‘भारत’चा ट्रेलर पाहिल्यानंतर सध्या चाहत्यांच्या अशा कमेंट्सचा जणू पूर आला. काही दिवसांपूर्वी सलमानची आई सलमा खान आणि कतरीनाचा एकत्र फोटो पाहून चाहते असेच उत्साहित झाले होते. सासू-सूनेची जोडी अशा कमेंट्स चाहत्यांनी दिल्या होत्या.
सलमान व कटरिनाची रिअल लाईफ केमिस्ट्रीपेक्षा रिल लाईफ केमिस्ट्री दमदार आहे. एकदा सलमानसोबतच्या नात्याबद्दल बोलताना खुद्द कतरीनाने आमच्यात एक खास नाते आहे. पण या नात्याला नाव देता येणार नाही, असे म्हटले होते. कधी काळी सलमान व कॅटच्या रिअल लाईफ रोमान्सच्या बातम्या चर्चेत होत्या. पण अचानक या दोघांत रणबीर कपूरची एन्ट्री झाली आणि भाईजान व कॅटचे ब्रेकअप झाले. पुढे अगदी चित्रपटांत शोभावे तसे कॅट व रणबीरचेही ब्रेकअप झाले आणि कॅट पुन्हा भाईजानच्या जवळ आली. कदाचित म्हणूनच प्रसंग कुठलाही असो, भाईजान कॅटच्या मदतीला तत्पर असतो. तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो.


Web Title: fans reguest arbaaz khan to get salman khan and katrina kaif married
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.