इम्रान हाश्मीचा 'हरामी' लूक पाहून चाहत्यांची 'नॉटी' कमेंट 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 08:51 PM2020-09-14T20:51:33+5:302020-09-14T20:51:57+5:30

किसिंग किलर म्हणून इम्रान हाश्मीची बॉलिवूडमध्ये ओळख बनली आहे. त्यामुळे, इम्रान म्हटलं की चित्रपटात किस सीन आलाच. आता, इम्रानचा आगामी चित्रपट हरामी या चित्रपटात चाहत्यांना काय पाहायला मिळणार ही उत्कंठा सर्वांनाच लागली आहे.

Fans' naughty comment after seeing Imran Hashmi's new look of HARAMI | इम्रान हाश्मीचा 'हरामी' लूक पाहून चाहत्यांची 'नॉटी' कमेंट 

इम्रान हाश्मीचा 'हरामी' लूक पाहून चाहत्यांची 'नॉटी' कमेंट 

googlenewsNext
ठळक मुद्देकिसिंग किलर म्हणून इम्रान हाश्मीची बॉलिवूडमध्ये ओळख बनली आहे. त्यामुळे, इम्रान म्हटलं की चित्रपटात किस सीन आलाच. आता, इम्रानचा आगामी चित्रपट हरामी या चित्रपटात चाहत्यांना काय पाहायला मिळणार ही उत्कंठा सर्वांनाच लागली आहे

मुंबई - बॉलिवूडचा मर्डर फेम अभिनेता इम्रान हाश्मीने आपल्या नवीन चित्रपटातील लुक चाहत्यांसाठी शेअर केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन इम्रानने हरामी या चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर करत चाहत्यांना धक्काच दिलाय. कारण, या चित्रपटातील इम्रानचा हा लूक अतिशय वेगळा असून चित्रपटाच्या नावाला शोभेल असे त्याचे कॅरेक्टर असल्याचा अंदाज तुम्हाला चित्रपटाच्या पोस्टरवरुन बांधता येईल. इम्रानचा हा लूक पाहिल्यानंतर चाहत्यांनी नॉटी कमेंट केल्या आहेत. 

किसिंग किलर म्हणून इम्रान हाश्मीची बॉलिवूडमध्ये ओळख बनली आहे. त्यामुळे, इम्रान म्हटलं की चित्रपटात किस सीन आलाच. आता, इम्रानचा आगामी चित्रपट हरामी या चित्रपटात चाहत्यांना काय पाहायला मिळणार ही उत्कंठा सर्वांनाच लागली आहे. कारण, या चित्रपटातील अभिनेत्याचा हटके लूक अनेकांना घायाळ करणार आहे. वाढलेले केस, वाढलेली दाढी आणि डोळ्यावर चष्मा असलेला इम्रान हरामी दिसून येतोय. माझ्या आगामी हरामी या चित्रपटातील पहिला लूक असे म्हणत इम्रानने हा फोटो शेअर केला आहे. 

हरामी या चित्रपटाचा वर्ल्ज प्रिमीयर 25 ऑक्टोबर 2020 रोजी दक्षिण कोरियातील बुसान इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हलमध्ये होणार आहे. श्याम मदीराजू यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. मुंबईतीललोकल रेल्वेत घुसणाऱ्या टपोरी मुलाची ही कथा आहे. कुठल्यातरी गँगसाठी हा मुलगा काम करत असतो. चित्रपटाच्या कथेला ट्विस्ट तेव्हा येतो, जेव्हा एक महिला आत्महत्येचा प्रयत्न करते. या चित्रपटातील इतर कलाकारांची नावे अद्याप समोर आली नाहीत. तर, इम्रानसोबत कोणती अभिनेत्री चित्रपटात झळकणार हेही अद्याप गुलदस्त्यातच आहे. 

दरम्यान, 'मुंबई सागा' आणि 'चेहरे' हे दोन आगामी चित्रपट इम्रानच्या खिशात आहेत. मुंबई सागा या चित्रपटात इम्रानसोबत जॉन अब्राहम पाहायला मिळणार आहे. तर, चेहरे या चित्रपटात बिग बी अमिताभ बच्चनसोबत इम्रान झळकणार आहे. या चित्रपटाचे काही पोस्टर्स ही झळकले आहेत. 

Web Title: Fans' naughty comment after seeing Imran Hashmi's new look of HARAMI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.