The fans of 'The' actresses dance still today | 'या' अभिनेत्रींच्या नृत्याची चाहत्यांना आजही भुरळ
'या' अभिनेत्रींच्या नृत्याची चाहत्यांना आजही भुरळ

-रवींद्र मोरे
आपल्या चित्रपट सृष्टीत असे काही कलाकार आहेत जे अभिनयाबरोबरच अन्य कलांमध्येही निपुण आहेत आणि ते वेळोवेळी भारतीय दर्शकांसमोर आपल्या कलेचे सादरीकरणही करत असतात. कित्येक बॉलिवूड अभिनेत्री आहेत ज्यांनी अभिनयाबाबत प्रशंसा तर मिळविल्या आहेत पण सोबतच गायन, नृत्य या कलांबाबतही मोठी प्रसिद्धी मिळविली आहे. सध्याची परिस्थिती पाहता आज नृत्यात अशी दमदार अभिनेत्री दिसत नाही, जिचे नृत्य अविस्मरणीय ठरेल. मात्र गतकाळातील अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांच्या नृत्याची आजची चाहत्यांना भूरळ आहे.

रेखा
बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री रेखाच्या सौंदर्याने आजही तिचे चाहते घायाळ आहेत. ‘इन आॅँखो की मस्ती...’ यासारख्या गाण्यांवरील रेखाच्या नृत्य प्रदर्शनाला तर तोडच नाही. जेव्हा रेखा डान्स करतात तेव्हा तर दर्शक तिच्याकडे एकटक पाहतच राहतात. रेखाने अनेक चित्रपटांतून बहारदार नृत्य प्रदर्शन करुन चाहत्यांचे मन जिंकले आहे.

ऐश्वर्या राय-बच्चन
ऐश्वर्या राय बच्चनच्या डान्स कॅलिबरची जेवढी प्रशंसा करावी तेवढी कमी आहे. ‘नींबूडा नींबूडा...’, ‘डोला रे..’ आणि ‘ढोली तारो...’ आदी गाण्यांवरील ऐशच्या डान्सने तर मुलींच्या मनात डान्स शिकण्याची एक वेगळीच उत्सुकता निर्माण केली. विशेष म्हणजे ‘के्रझी किया रे...’ या गाण्यावरही ऐशचे डान्स परफॉर्म्स उत्कृष्ट होते.

माधुरी दीक्षित
बॉलिवूडमध्ये डान्सचे नाव घ्यावे आणि धक धक गर्ल माधुरी दीक्षितच्या नावाचा उल्लेख नसणे असे होऊच शकत नाही. माधुरीच्या डान्स स्टेप्स आणि तिचे ठुमके एवढे जबरदस्त आहेत की, ज्याची कोणीच बरोबरी करु शकत नाही. आजदेखील माधुरी एखाद्या ठिकाणी नृत्य प्रदर्शन करते तर चाहते तिचे डान्स स्टेप्स पाहण्यासाठी खूप उत्सुक असतात. बऱ्याच गाण्यांवरील माधुरीचे डान्स मूव्हमेंटची प्रशंसा केली तेवढी कमी आहे.

ऊर्मिला मातोंडकर
छम्मा छम्मा गाण्यावरील ऊर्मिलाचा डान्स कोण विसरु शकणार? रंगिला चित्रपटाद्वारे ऊर्मिलाने हे गाणे सादर करुन बॉलिवूडमध्ये एक वेगळीच ओळख निर्माण केली होती. तिच्या अभिनयाची प्रशंसा तर झालीच होती, सोबतच तिच्या डान्स परफॉर्म्समुळेही तिला खूपच प्रसिद्धी मिळाली होती.

हेमामालिनी
बॉलिवूडची ड्रीमगर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हेमामालिनी बऱ्याच अभिनेत्रींसाठी रोल मॉडल आहे. विशेष म्हणजे हेमामालिनी शास्त्रीय नृत्य कलेतही निपुण आहेत, शिवाय हेमाचे डान्स परफॉर्म्सदेखील उल्लेखनीय आहे. आजही हेमा जेव्हा आपल्या डान्सच्या काही स्टेप्स सादर करतात तेव्हा दर्शक मंत्रमुग्ध होतात.


Web Title: The fans of 'The' actresses dance still today
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.