इम्रान हाश्मी आणि या अभिनेत्रीच्या अफेअरची रंगली होती चर्चा, ही आता आहे प्रसिद्ध क्रिकेटरची पत्नी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 12:37 PM2020-03-31T12:37:13+5:302020-03-31T12:44:59+5:30

इम्रानचे अफेअर एका अभिनेत्रीसोबत चांगलेच गाजले होते आणि ही अभिनेत्री आज एका प्रसिद्ध क्रिकेटरची पत्नी आहे.

emraan hashmi geeta basra affair was famous at the time of The train movie PSC | इम्रान हाश्मी आणि या अभिनेत्रीच्या अफेअरची रंगली होती चर्चा, ही आता आहे प्रसिद्ध क्रिकेटरची पत्नी

इम्रान हाश्मी आणि या अभिनेत्रीच्या अफेअरची रंगली होती चर्चा, ही आता आहे प्रसिद्ध क्रिकेटरची पत्नी

googlenewsNext
ठळक मुद्देद ट्रेन या इम्रानच्या चित्रपटात आपल्याला गीता बसरा या अभिनेत्रीला पाहायला मिळाले होते. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान इम्रान आणि गीताच्या अफेअरची चांगलीच चर्चा रंगली होती.

एकापाठोपाठ एक चित्रपटांमध्ये किसिंग सीन्स देणारा आणि यामुळे बॉलिवूडमध्ये ‘सिरीयल किसर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता इम्रान हाश्मीने त्याची आज बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘फुटपाथ’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करणा-या इम्रानने जवळपास आपल्या प्रत्येक सिनेमात किसींग सीन दिला आहे. त्यामुळे त्याला बॉलिवूडमध्ये सिरियल किसर म्हणून ओळखले जाते. पण असे असले तरी त्याच्या अनेक चित्रपटांमधील अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले आहे. मर्डर या चित्रपटामुळे त्याला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. त्याने जहेर, द डर्टी पिक्चर, जन्नत असे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. 

आज इम्रानबाबत एक खास गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. एकेकाळी इम्रानचे अफेअर एका अभिनेत्रीसोबत चांगलेच गाजले होते आणि ही अभिनेत्री आज एका प्रसिद्ध क्रिकेटरची पत्नी आहे. इम्रानच्या चित्रपटांइतकीच चित्रपटांची गाणी चांगलीच गाजली आहेत आणि विशेष म्हणजे इम्रानच्या अनेक चित्रपटांमध्ये नवोदित अभिनेत्रींना संधी देण्यात आलेली आहे. द ट्रेन या इम्रानच्या चित्रपटात आपल्याला गीता बसरा या अभिनेत्रीला पाहायला मिळाले होते. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान इम्रान आणि गीताच्या अफेअरची चांगलीच चर्चा रंगली होती. त्यावेळी इम्रानचे लग्न देखील झालेले होते. पण इम्रान आणि गीता एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले असल्याच्या चर्चांना चांगलाच ऊत आला होता. पण त्या दोघांनीही या चर्चांवर मौन राखणेच पसंत केले होते.

गीताचे काही वर्षांपूर्वी लग्न प्रसिद्ध क्रिकेटर हरभजन सिंगसोबत झाले असून त्यांना एक मुलगी देखील आहे. गीताने काही चित्रपटांमध्ये काम केले असले तरी तिला म्हणावी तशी लोकप्रियता मिळाली नाही. आज गीता बॉलिवूडपासून दूर आपल्या खाजगी आयुष्यात प्रचंड खूश आहे. 

Web Title: emraan hashmi geeta basra affair was famous at the time of The train movie PSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.