अशी आहे इम्रान हाश्मी आणि त्याच्या पत्नीची लव्ह स्टोरी, पाहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 10:48 AM2020-03-24T10:48:56+5:302020-03-24T10:50:15+5:30

इम्रान हाश्मीची पत्नी दिसायला खूपच छान असून ती शिक्षिका आहे.

Emraan Hashmi And Parveen Shahani's Love Story PSC | अशी आहे इम्रान हाश्मी आणि त्याच्या पत्नीची लव्ह स्टोरी, पाहा तिचे फोटो

अशी आहे इम्रान हाश्मी आणि त्याच्या पत्नीची लव्ह स्टोरी, पाहा तिचे फोटो

googlenewsNext
ठळक मुद्देइम्रानने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या आधीपासूनच इम्रान आणि परवीन यांचे अफेअर होते. ती इम्रानच्या स्ट्रगलच्या काळात नेहमीच त्याच्या पाठिशी उभी राहिली आहे.

एकापाठोपाठ एक चित्रपटांमध्ये किसिंग सीन्स देणारा आणि यामुळे बॉलिवूडमध्ये ‘सिरीयल किसर’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता इमरान हाश्मी याचा आज वाढदिवस. ‘फुटपाथ’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करणा-या इमराने जवळपास आपल्या प्रत्येक सिनेमात किसींग सीन दिला आहे. त्यामुळे त्याला बॉलिवूडमध्ये सिरियल किसर म्हणून ओळखले जाते. इम्रान अनेक वर्षं बॉलिवूडमध्ये असला तरी तो त्याच्या खाजगी आयुष्याविषयी न बोलणेच पसंत करतो.

तुम्हाला माहीत आहे का, इम्रान हाश्मीची पत्नी दिसायला खूपच छान असून ती शिक्षिका आहे. त्याने फूटपाथ या चित्रपटापासून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. मर्डर या चित्रपटामुळे त्याला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. त्याने जहेर, द डर्टी पिक्चर, जन्नत असे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. तो या झगमगत्या दुनियेशी संबंधित असला तरी त्याच्या पत्नीचा या क्षेत्राशी काहीही संबंध नाही. त्याची पत्नी ही टिचर असून तिचे नाव परवीन सहानी आहे. 

इम्रानने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या आधीपासूनच इम्रान आणि परवीन यांचे अफेअर होते. ती इम्रानच्या स्ट्रगलच्या काळात नेहमीच त्याच्या पाठिशी उभी राहिली आहे. त्यांनी साडे सहा वर्षांच्या अफेअरनंतर २००६ मध्ये लग्न केले. त्या दोघांना २०१०मध्ये मुलगा झाला. त्याचे नाव अयान असून काही वर्षांपूर्वी अयानला कर्करोग असल्याचे निदान झाले होते. अयानच्या आजारपणात इम्रान आणि परवीनने हार न पत्करता त्याच्या आजारपणाला तोंड दिले. आज अयान पूर्णपणे बरा झाला आहे. इम्रान आणि परवीनने मुस्लीम पद्धतीने विवाह केला होता. इम्रानचे वडील मुस्लीम असून त्याची आई ख्रिश्चन आहे. परवीन आणि इम्रान बॉलिवूडमधील क्यूट कपलमधील एक कपल असून त्या दोघांना अनेक पार्टी, पुरस्कार सोहळ्यांना एकत्र पाहाता येते.

Web Title: Emraan Hashmi And Parveen Shahani's Love Story PSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.