अखेर दिसलाच एकता कपूरच्या मुलाचा चेहरा, पाहा पहिला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2019 11:17 AM2019-08-27T11:17:34+5:302019-08-27T11:45:11+5:30

रवीच्या जन्मानंतर त्याचा एकही फोटो फोटोग्राफर्सच्या कॅमे-यात येऊ नये, याबद्दल एकता कमालीची सजग होती. त्यामुळेच इतक्या महिन्यात रवीचा एकही फोटो समोर आला नाही. पण जन्माष्टमीच्या मुहूर्तावर एकताचे सगळे प्रयत्न फसले

ekta kapoor son ravie first picture out mistakenly when he dressed as krishna at mandir | अखेर दिसलाच एकता कपूरच्या मुलाचा चेहरा, पाहा पहिला फोटो

अखेर दिसलाच एकता कपूरच्या मुलाचा चेहरा, पाहा पहिला फोटो

googlenewsNext
ठळक मुद्देएकताला टीव्ही इंडस्ट्रीची ‘क्वीन’ म्हणून ओळखले जाते. १९९५ मध्ये टीव्ही आलेल्या एकता कपूर निर्मित ‘हम पांच’ या मालिकेने लोकप्रीयतेचा कळस गाळला.

टीव्ही क्वीन एकता कपूरने लग्न न करता सरोगसीद्वारे एका मुलाला जन्म दिला होता. यावर्षी 27 जानेवारीला एकता आई बनली होती. एकताने रवी असे मुलाचे नामकरण केले होते. रवीच्या जन्मानंतर त्याचा एकही फोटो फोटोग्राफर्सच्या कॅमे-यात येऊ नये, याबद्दल एकता कमालीची सजग होती. त्यामुळेच इतक्या महिन्यात रवीचा एकही फोटो समोर आला नाही. पण जन्माष्टमीच्या मुहूर्तावर एकताचे सगळे प्रयत्न फसले आणि रवी पहिल्यांदा कॅमे-यात कैद झाला.

जन्माष्टीमच्या दिवशी एकता मुलासोबत मंदिरात पोहोचली. फोटोग्राफर्सनी त्याचे फोटो घेतले. एकताने रवीच्या चेह-यावर हात ठेवून त्याचा चेहरा लपवण्याचे अनेक प्रयत्न केलेत. पण तिचे सगळे प्रयत्न व्यर्थ गेलेत. मंदिरात दर्शनावेळी रवीचे अनेक फोटो कॅमे-यात कैद झालेत. यावेळी एकताचा मुलगा पारंपरिक पोशाखात दिसला.

एकताला टीव्ही इंडस्ट्रीची ‘क्वीन’ म्हणून ओळखले जाते. १९९५ मध्ये टीव्ही आलेल्या एकता कपूर निर्मित ‘हम पांच’ या मालिकेने लोकप्रीयतेचा कळस गाळला. महिला गँगची ही मालिका लोकांना प्रचंड आवडली. या मालिकेची कल्पना एकताची होती. एकता व तिची आई शोभा कपूर यांनी साकारलेल्या बालाजी टेलिफिल्मने ही मालिका प्रोड्यूस केली आणि यानंतर एकताने कधीच मागे वळून पाहिले नाही. एकताने चाळीशी ओलांडली आहे आणि आजपर्यंत तिने ४० पेक्षा अधिक मालिका व चित्रपट प्रोड्यूस केले आहेत. तिच्या नावावर २० पेक्षा अधिक हिट मालिका आहेत. पण  हम पांच , क्यों की सांस भी कभी बहू थी, कसौटी जिंदगी की, कहानी घर घर की आणि नागीन या पाच मालिकांनी एकताला ‘टीव्हीची क्वीन’ बनवले.

Web Title: ekta kapoor son ravie first picture out mistakenly when he dressed as krishna at mandir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.