ठळक मुद्देनुकताच प्रभासचा ‘साहो’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. चार भाषांत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आत्तापर्यंत 100 कोटींची कमाई केली आहे.

‘बाहुबली’ सीरिज रिलीज झाली आणि साऊथस्टार प्रभास  चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला. 17 वर्षांपूर्वी प्रभासने फिल्मी करिअर सुरु केले होते. या 17 वर्षांच्या प्रवासात प्रभासच्या लूकमध्ये प्रचंड बदल झाला आहे. त्याचे काही जुने फोटो पाहिल्यानंतर त्याला ओळखणेही कठीण होईल, इतका हा बदल मोठा आहे.

प्रभासने 2002 मध्ये ‘ईश्वर’ या चित्रपटातून डेब्यू केला होता. यानंतर तो अनेक चित्रपटांत दिसला. त्याला खरी ओळख मिळाली तर एस.एस. राजमौलींच्या ‘छत्रपति’या चित्रपटामुळे.

हा फोटो प्रभासच्या ‘ईश्वर’ या चित्रपटातील आहे. या फोटोतील प्रभासला कदाचित पहिल्या नजरेत चाहते ओळखणारही नाहीत.

‘छत्रपति’ या चित्रपटाने प्रभासला स्टार बनवले. यात त्याने रिफ्युजीची भूमिका साकारली होती. यातील प्रभासचा लुक चाहत्यांना प्रचंड आवडला होता.

यानंतर प्रभास ‘योगी’ व ‘मुन्ना’ या चित्रपटात दिसला.

प्रभासने काळासोबत साऊथ इंडस्ट्रीत स्वत:चे स्थान पक्के केले. ‘बाहुबली’ नंतर तर त्याची लोकप्रियता कमालीची वाढली. ‘बाहुबली’ रिलीज झाल्यानंतर प्रभासला 6000 तरूणींनी लग्नाचे प्रस्ताव पाठवले, यावरून त्याच्या लोकप्रियतेचा अंदाज आपण बांधू शकतो.

प्रभासने अनेक सुपरहिट सिनेमे दिलेत. पण ‘बाहुबली’ने सगळे विक्रम मोडले. या चित्रपटासाठी त्याने जीवतोड मेहनत केली. जिममध्ये तासन् तास घाम गाळला. ‘बाहुबली’च्या निर्मात्यांनी प्रभासला 1.5 कोटींचे एक्सरसाईज मशीन गिफ्ट दिले, ते त्याचमुळे. या चित्रपटासाठी प्रभासला वजन वाढवायचे होते. पीळदार शरीर कमवायचे होते. प्रभासने ते करून दाखवले.

नुकताच प्रभासचा ‘साहो’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. चार भाषांत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आत्तापर्यंत 100 कोटींची कमाई केली आहे.
 

Web Title: eeswar to saaho huge transformation in prabhas looks during 17 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.