दुलकर सलमानसोबत जमणार जान्हवी कपूरची जोडी?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2018 12:50 PM2018-12-09T12:50:28+5:302018-12-09T12:52:22+5:30

होय,  सूत्राच्या माहितीनुसार, जान्हवी कपूर आपल्या तिस-या सिनेमाच्या तयारीला लागली आहे. या सिनेमात ती आर्मी आॅफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे.

Dulquer Salmaan roped in to romance Janhvi Kapoor in IAF officer Gunjan Saxena's biopic? | दुलकर सलमानसोबत जमणार जान्हवी कपूरची जोडी?

दुलकर सलमानसोबत जमणार जान्हवी कपूरची जोडी?

googlenewsNext
ठळक मुद्देसाऊथ इंडस्ट्रीचा आघाडीचा स्टार दुलकर सलमानने अलीकडे ‘कारवां’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता.

 करण जोहर निर्मित ‘धडक’ या चित्रपटातून बॉलिवूडवर जोरदार ‘धडक’ देणा-या जान्हवी कपूरकडे सध्या आॅफर्सची कमी नाही. ईशान खट्टरसोबत ‘धडक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्याबरोबर तिला करण जोहरचाच ‘तख्त’ हा दुसरा सिनेमा मिळाला. तूर्तास जान्हवी या मल्टीस्टारर चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. 'तख्त'मध्ये दिसणार आहे. हा सिनेमा औरंगजेब व दाराशिकोहच्या कथेवर आधारीत असणार आहे. २०२०मध्ये प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमात जान्हवी हिराबाई जैनाबादीची भूमिका करणार आहे. हा चित्रपट संपण्याआधीच जान्हवीच्या तिस-या चित्रपटाची चर्चा रंगली आहे. होय,  सूत्राच्या माहितीनुसार, जान्हवी कपूर आपल्या तिस-या सिनेमाच्या तयारीला लागली आहे. या सिनेमात ती आर्मी आॅफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शरन शर्मा करणार आहेत. अद्याप या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. 
जान्हवीच्या तिस-या सिनेमाची कथा व इतर कलाकारांबाबत अद्याप काहीही समजू शकलेले नाही. त्यामुळे या सिनेमाबद्दल जाणून घेण्यासाठी जान्हवीचे चाहते खूप उत्सुक आहेत. पण चित्रपटाबद्दलची ताजी बातमी म्हणजे, या चित्रपटात जान्हवीच्या अपोझिट दुलकर सलमान दिसणार असल्याची खबर आहे.

होय, साऊथ इंडस्ट्रीचा आघाडीचा स्टार दुलकर सलमानने अलीकडे ‘कारवां’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. आता तो जान्हवीसोबत आॅनस्क्रीन रोमान्स करणार असल्याची खबर आहे. दोघांचीही लव्ह केमिस्ट्री यात बघायला मिळणार असल्याचे कळते.


दुलकरबद्दल सांगायचे तर त्याचा ‘कारवां’ या चित्रपटानंतर त्याच्याकडे बॉलिवूडच्या अनेक आॅफर्स आहेत. लवकरच तो‘द जोया फॅक्टर’मध्ये दिसणार आहे. यात दुलकर एका क्रिकेट कर्णधाराच्या रूपात आहे. या चित्रपटासाठी दुलकर सध्या क्रिकेटमधील बारकावे शिकतोय. या चित्रपटात तो सोनम कपूरसोबत दिसणार आहे.
 

Web Title: Dulquer Salmaan roped in to romance Janhvi Kapoor in IAF officer Gunjan Saxena's biopic?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.