पानावलेल्या डोळ्यांनी सनी देओलने मुलगा करणला म्हटले, ‘सॉरी बेटा, मी हे तुझ्यासाठीच करीत आहे’!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2017 11:01 AM2017-10-31T11:01:31+5:302017-10-31T16:31:31+5:30

स्टार किड्स करण देओलला कोणाच्या शिफारशीची अथवा नावाची गरज नाही. कारण देओल परिवाराचे इंडस्ट्रीमधील योगदान पाहता करणही त्याचा डेब्यू ...

Drawn eyes to Sunny Deol's son Karan, 'Sorry son, I am doing this for you'! | पानावलेल्या डोळ्यांनी सनी देओलने मुलगा करणला म्हटले, ‘सॉरी बेटा, मी हे तुझ्यासाठीच करीत आहे’!

पानावलेल्या डोळ्यांनी सनी देओलने मुलगा करणला म्हटले, ‘सॉरी बेटा, मी हे तुझ्यासाठीच करीत आहे’!

googlenewsNext
टार किड्स करण देओलला कोणाच्या शिफारशीची अथवा नावाची गरज नाही. कारण देओल परिवाराचे इंडस्ट्रीमधील योगदान पाहता करणही त्याचा डेब्यू दमदारपणे करेल यात शंका नाही. ज्या पद्धतीने गेल्या काही काळापासून देओल परिवाराने इंडस्ट्रीत आपला जलवा दाखविला आहे, त्यावरून त्यांची तिसरी पिढीदेखील असाच काहीसा करिष्मा करणार असल्याची सध्या चर्चा आहे. ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटातून पप्पा सनी देओल करणला लॉन्च करीत आहेत. सध्या या चित्रपटाची शूटिंग सुरू असून, याचदरम्यान एक क्षण असा आला ज्यावेळी हे बाप-लेक इमोशनल होऊन अशरक्ष: रडू लागले. 

बॉलिवूडचे हीमॅन धर्मेंद्र यांनी मुलगा सनी देओलला इंडस्ट्रीत लॉन्च केले. आता ही परंपरा कायम ठेवताना सनीने त्याचा मुलगा करण ऊर्फ राजवीर देओलला लॉन्च करण्याची पूर्ण तयारी केली आहे. सनी देओलच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटात करण मुख्य भूमिकेत झळकणार आहे. सध्या या चित्रपटाची शूटिंग हिमाचल प्रदेशच्या बर्फाच्छादित प्रदेशात सुरू आहे. सूत्रानुसार, सनीने शूटिंगसाठी १५,००० फूट उंचीवरील एका लोकेशनची निवड केली होती. ज्याठिकाणी चार डिग्रीपेक्षा कमी तपमान आहे. याठिकाणी करण आणि अभिनेत्री साहीर बांबा हिला एक सीन शूट करायचा होता. अशा स्थितीत दिवसभरात केवळ एकच शॉट पूर्ण करता आला. 



त्यातच रिटेकवर रिटेक अन् जबरदस्त थंडीमुळे वैतागलेला करण पप्पा सनी देओलजवळ आला अन् जोरजोरात रडू लागला. मुलाच्या डोळ्यात अश्रू बघून सनीचेही डोळे पानावले. सनीने म्हटले की, ‘सॉरी बेटा, मात्र मला समजून घेण्याचा प्रयत्न कर. मी हे सर्व काही तुझ्या करिअरसाठीच करीत आहे.’ पप्पा सनीचे हे बोल ऐकून करणने पुढे शूटिंग पूर्ण केले. सुरुवातीला धर्मेंद्र त्यानंतर दुसरी पिढी सनी-बॉबी आणि सावत्र बहीण ईशा देओल अन् आता तिसरी पिढी करणच्या रूपात बॉलिवूडमध्ये एंट्री करीत आहे. 

Web Title: Drawn eyes to Sunny Deol's son Karan, 'Sorry son, I am doing this for you'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.