ठळक मुद्दे भूमिकेसाठी दीपिका पादुकोणच्या नावाचा विचार केला जातो आहेकॅटरिना कैफचे नावदेखील याभूमिकेसाठी जोरदार चर्चेत आहे

फराहन अख्तरचा 'डॉन 3' सिनेमा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. रिपोर्टनुसार शाहरुख खानने या हिट सिनेमातून हातवर काढले आहेत. शाहरुखनंतर या सिनेमासाठी मेकर्स रणवीर सिंगच्या नावाचा विचार करत असल्याचे आम्ही तुम्हीला आधीच सांगितले आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे का, यात अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी दीपिका पादुकोणच्या नावाचा विचार केला जातो आहे. 


डेक्कन क्रोनिकलच्या रिपोर्टनुसार, 'डॉन 3' साठी मेकर्सने दीपिका पादुकोणला अप्रोच केले आहे. तसेच कॅटरिना कैफचे नावदेखील याभूमिकेसाठी जोरदार चर्चेत आहे. जर 'डॉन3' साठी दीपिकाचे नाव फायनल करण्यात आले तर लग्नानंतर दीपिका आणि रणवीर पहिल्यांदा एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसतील.  2018 मध्ये आलेल्या संजय लीला भन्सालींच्या 'पद्मावत' या सुपरहिट सिनेमात ही जोडी दिसली होती.   


2006मध्ये डॉनचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यात शाहरुख आणि प्रियंका चोप्राची जोडी होती. तर करिनाचा कॅमिओ होता. त्यानंतर 2011 मध्ये आलेल्या डॉन 2 मध्ये पुन्हा प्रियंका-शाहरुख दिसले होते. मात्र डॉन3 शाहरुखने सोडला आहे. त्यामुळे मेकर्स आता नव्या हिरोच्या शोधात आहेत. दोनचे पहिले दोनही पार्ट बॉक्स ऑफिसवर हिट गेले आहेत. आता तिसऱ्या भागात कोणची वर्णी लागलते हे आपल्याला लवकरच कळेल. 


 वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर रणवीर सिंग सध्या ८३च्या तयारीला लागला आहे. तर दीपिका दिल्लीमध्ये छपाकच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. 
 


Web Title: Don 3 deepika padukone ranveer singh shahrukh khan katrina kaif
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.