'डोंबिवली फास्ट' फेम दिग्दर्शक निशिकांत कामतचे हैदराबादमध्ये निधन, हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 12:24 PM2020-08-17T12:24:23+5:302020-08-17T12:25:00+5:30

Marathi, Hindi Director Nishikant Kamat Dies of liver cirrhosis: 'डोंबिवली फास्ट', 'दृश्यम' फेम दिग्दर्शक निशिकांत कामतचे नुकतेच हैदराबाद येथे निधन झाले आहे.

'Dombivali Fast' fame director Nishikant Kamat passes away in Hyderabad, mourning over Hindi and Marathi film industry | 'डोंबिवली फास्ट' फेम दिग्दर्शक निशिकांत कामतचे हैदराबादमध्ये निधन, हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा

'डोंबिवली फास्ट' फेम दिग्दर्शक निशिकांत कामतचे हैदराबादमध्ये निधन, हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा

Next

'डोंबिवली फास्ट', 'दृश्यम' फेम दिग्दर्शक निशिकांत कामतचे नुकतेच हैदराबाद येथे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याची प्रकृती बिघडली होती आणि त्याच्यावर हैदराबादमधील रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र अखेर त्याची आज प्राणज्योत मालवली. त्याच्या निधनामुळे हिंदी मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

निशिकांत कामतला यकृताशी संबंधित आजारामुळे त्रास होत होता आणि त्यावर हैदराबादमधील रुग्णालयात उपचार सुरु होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 31 जुलैला सांगितले जात होते की त्याला कावीळ आणि पोट फुगल्यानंतर हैदराबादमधील एका रुग्णालयात दाखल केले होते. तेव्हापासून त्याच्यावर अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. असे सांगितले जात आहे की यकृतमध्ये दुय्यम संसर्ग झाल्यामुळे त्याचे निधन झाले.


निशिकांत कामतने 'डोंबिवली फास्ट' या मराठी चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. हा सिनेमा सुपरहिट ठरला. २००६ मधील मुंबई बॉम्बस्फोटावर आधारित हिंदीतील 'मुंबई मेरी जान' या चित्रपटाचेही त्याने दिग्दर्शन केले. त्यानंतर निशिकांत कामतने 'दृश्यम', 'मदारी', 'फुगे' यासारख्या चित्रपटांचे सुद्धा दिग्दर्शन केले होते. याशिवाय, 'सातच्या आत घरात', 'रॉकी हॅण्डसम', 'जुली 2', 'मदारी', 'भावेश जोशी' या सारख्या हिंदी-मराठी चित्रपटात निशिकांत कामतने अभिनय केला होता.



दरम्यान, अभिनेता अजय देवगणचा ‘दृश्यम’ सिनेमा दिग्दर्शित केल्यानंतर प्रकृतीच्या कारणांमुळे त्याने दिग्दर्शन थांबवून फक्त अभिनेता म्हणूनच काम करण्यास सुरुवात केल्याचे सांगण्यात येते. तसेच, आगामी 'दरबार' या चित्रपटासाठी तो काम करत होता.

Read in English

Web Title: 'Dombivali Fast' fame director Nishikant Kamat passes away in Hyderabad, mourning over Hindi and Marathi film industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.