सुशांतच्या आत्महत्येच्या मागचं कारण माहित आहे कंगनाला?, म्हणाली - नाव सांगेन फक्त याच अटीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 12:13 PM2020-06-18T12:13:14+5:302020-06-18T12:13:30+5:30

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर कंगना रानौतने धक्कादायक खुलासा केला आहे.

Does Kangana know the reason behind Sushant's suicide ?, said - I will name only on this condition | सुशांतच्या आत्महत्येच्या मागचं कारण माहित आहे कंगनाला?, म्हणाली - नाव सांगेन फक्त याच अटीवर

सुशांतच्या आत्महत्येच्या मागचं कारण माहित आहे कंगनाला?, म्हणाली - नाव सांगेन फक्त याच अटीवर

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येच्या वृत्तामुळे बॉलिवूडमधील कलाकार व त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. सोशल मीडियावर एकीकडे त्याच्या निधनावर हळहळ व्यक्त केली जाते आहे तर दुसरीकडे नेपोटिझमवर वादविवाद ऐकायला मिळतो आहे. नेपोटिझमच्या चर्चेला आणखीन जोर मिळाला कंगना रानौतच्या विधानानंतर. कंगनाने सुशांतच्या निधनानंतर धक्कादायक खुलासे केले. तिच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर घराणेशाहीला खूप मोठा विरोध होताना पहायला मिळाला.

कंगना रानौतने नुकतेच दिलेल्या स्टेटमेंटमध्ये मुकेश भट यांच्यावर तीव्र टिका केली. मुकेश भट यांनी सुशांतच्या निधनानंतर म्हटले होते की, जवळपास दीड वर्षांपूर्वी सुशांतला भेटलो त्यावेळीच मला असं काही घडेल असं वाटलं होतं. कंगनाने नुकतेच पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, मी जेव्हा हे बोलतेय तेव्हा माझे हात थरथरत आहे. आपण चीनमुळे संकटात आहोत. आपले सैन्य बॉर्डरवर शहीद झालेत. पण माझ्या डोक्यातून सुशांतची आत्महत्या जात नाही. कंगना म्हणाली की, चित्रपट निर्मात्यांनी हेदेखील म्हटलं की, सुशांत परवीन बाबीच्या मार्गावर जाताना दिसत होता. अशी अफवा उडवली की त्याला पॅरानॉइड स्किझोफ्रेनिया होते.

कंगना पुढे म्हणाली की, मुकेश भट क्लेम करत आहे की सुशांत परवीन बाबींच्या मार्गावर जात होता. मात्र कोणाला लक्षात आहे की परवीन बाबीसोबत या लोकांनी काय केले होते.

कंगना म्हणाली की, माझी सुशांत आणि माझा म्युच्युअल फ्रेंड कमल जैनसोबत बोलणे झाले. त्याला माहित आहे की सुशांतच्या आत्महत्येमागे काय कारण होते. कमलजीने मला सांगितले की त्याची सोमवारी सुशांतसोबत बातचीत झाली होती. तो असा बोलत होता जसा यापूर्वी त्याने कधीच अशी बातचीत केली नव्हती.त्याने सांगितले होते की, माझ्यासोबत एक मोठा सिनेमा बनवा. मी हिट सिनेमे दिले आहेत मात्र माझ्याकडे कोणताच मोठा सिनेमा नाही. मला जसे हवंय तसे काम नाही. कमलजींनी त्याला विश्वास दिला होता की लॉकडाउन संपल्यावर त्याच्यासोबत काहीतरी काम करेन. याचा अर्थ की तो त्याच्या कामामुळे त्रस्त होता. लोकांनी त्याला बाजूला केले होते.

कंगनाने तिच्या वक्तव्यात सांगितले की कमल जैनसोबत तिचे बोलणे झाल्यानंतर तिला सुशांतशी निगडीत गोष्ट समजली आहे. तिने कित्येक नावांची हिंट देखील दिली मात्र जर चौकशी झाली तरच ती याबद्दल सांगणार अशी तिने अट ठेवली. कंगनाच्या अनुसार, सर्वांना माहित आहे की त्याला बाजूला काढून टाकण्यासाठी या लोकांनी कशापद्धतीने गँग बनवली होती. मी यापूर्वीच याबद्दल बोलले आहे आणि जर चौकशी केली तर ओपनली सांगेन कारण मीडियाकडे खूप प्रुफ आहेत. प्रत्येकाला माहित आहे की कोण कोण त्याच्या विरोधात गँग बनवून उभे होते.

Web Title: Does Kangana know the reason behind Sushant's suicide ?, said - I will name only on this condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.