बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित हिचे लाखो दिवाने आहेत. तिच्या एक से बढकर एक अदांवर दिवाने फिदा असतात. अशातच माधुरी आणि सलमानसह ‘हम आपके हैं कौन’च्या टीमने चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सेलिब्रेशन केले. यावेळी तिने संपूर्ण श्रेय टीमला आणि सर्वांच्या अभिनयाला दिले. पण, तुम्हाला माहितीये का? तिच्या व्यक्तिगत आयुष्यात तिची मुख्य सपोर्ट सिस्टीम कोण आहे ते? त्या आहेत तिच्या बहिणी. माधुरीला इंडस्ट्रीत एवढे वर्ष होऊनही चाहत्यांना तिच्या बहिणींबद्दल माहिती नाही. आज आम्ही तुम्हाला त्यांच्याबद्दल सांगणार आहोत...

‘टोटल धम्माल’ आणि ‘कलंक’ या चित्रपटाच्या माध्यमातून माधुरीने कमबॅक केले आहे. या दोन्ही चित्रपटांना बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला आहे. माधुरीने इंडस्ट्रीत पाऊल ठेवताच तिला तिच्या हास्यामुळे चित्रपटांच्या ऑफर्स  मिळणं बंद झालं. तिला बरेच दिग्दर्शक म्हणायचे की, तुझे दात पुढे येतात.  तरीपण माधुरी जिद्दी होती. तिने बॉलिवूडमध्ये आपले पाय घट्ट रोवले. पण एक वेळ अशी आली की, मोठमोठे दिग्दर्शक तिच्या याच हास्यावर फिदा झाले. तिच्या नावामुळेच अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर भरपूर गल्ला कमवायचे. माधुरी वयाच्या ३ऱ्या  वर्षापासून कथ्थकचे धडे घेत आहे. आता ती माधुरी श्रीराम नेने असून तिला दोन मुले देखील आहेत.

बऱ्याच चाहत्यांना तिला दोन बहिणी आणि एक भाऊ असल्याचे ठाऊक नसेल. रूपा दिक्षीत आणि भारती दिक्षीत अशा दोन बहिणी तर अजित दिक्षीत हा एक भाऊ देखील आहे. माधुरीचे स्टारडमचे एवढे होते की, तिच्या कुटुंबावर कुणाचेही लक्ष गेले नाही. माधुरीच्या वडिलांचे नाव शंकर दिक्षीत आणि आई स्रेहलता दिक्षीत असे आहे. माधुरीच्या बहिणी या ट्रेंड कथ्थक डान्सर्स असून त्यांनी कधीही बॉलिवूडमध्ये काम करण्याचा विचार केला नाही. रूपा आणि भारती आता सेटल झाल्या असून त्या तिघींमधील बाँण्डिंग आपण फोटोंमधून पाहूच शकता.       

Web Title:  Do you know the 'sisters' of Madhuri Dixit? Which are Madhuri's support system !!

Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.