ह्रतिकची पहिली कमाई माहितीय किती होती ? आकडा वाचून तुमचाही बसणार नाही विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2021 12:10 PM2021-02-04T12:10:39+5:302021-02-04T12:17:18+5:30

ह्रतिकचा हा स्पोर्टी अंदाज, खेळाचा थरार आणि जोश-उत्साह आपण 'धूम' तसंच 'क्रिश' 'वॉर' सारख्या सिनेमात पाहिलाय. 

Do You Know Hritik Roshan's FIRST Salary REVEALED | ह्रतिकची पहिली कमाई माहितीय किती होती ? आकडा वाचून तुमचाही बसणार नाही विश्वास

ह्रतिकची पहिली कमाई माहितीय किती होती ? आकडा वाचून तुमचाही बसणार नाही विश्वास

googlenewsNext

सेलिब्रिटी मंडळींवर रसिक जीव ओवाळून टाकतात. रसिकांचं या सेलिब्रिटींवर मनापासून प्रेम असतं. रसिकांच्या या प्रेमामुळेच सेलिब्रिटी मंडळी त्यांच्या करिअरमध्ये कोट्यवधींची कमाई करतात. दर महिन्याला सेलिब्रिटी गलेलठ्ठ कमाई करतात. करिअरच्या सर्वोच्च शिखरावर असताना होणा-या कमाईचा आकडा पाहून अनेकांना धक्काही बसतो. मात्र या यशामागे त्यांना करावा लागलेला संघर्षही सोपा नसतो. त्याच्या सोशल मीडियावर नजर टाकली तर तुम्हाला त्याच्या आलिशान लाईफस्टाइलचाही अंदाज येईलच.


वेग, थरार, आणि काहीही करण्याची तयारी यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीमधेय ह्रितिकने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. साहसाचा हाच थरार आणि विलक्षण अनुभव त्याला सारयापासून वेगळं बनवते.... या खिलाडू वृतीमुळेच हिंदी सिनेमात आपलं वेगळं अस्तित्व निर्माण करण्यात त्याला यश आलंय .

ह्रतिकचा हाच जोश आणि जल्लोष  दिसून आला...जेव्हा हॉट व्हील्स एक्स्ट्रीमच नेतृत्व असणाऱ्या ह्रीतीकने आपल्या टीमसाठी चमकदार कामगिरी केली होती. २५ फुट लांब  हॉट व्हील्समध्ये सहभागी होऊन त्याने आपल्या टीमच नाही तर देशाचं नावही आपल्या नावाप्रमाणे रोशन केले होते.

 

अनेकांनी तेव्हा त्याचे कौतुक केले होते. त्याने या  हॉट व्हील्सच्या या २५ फुट लांब थ्रील मशीनचे उद्घाटन करत आपलं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलंय.

सुरुवातीपासून खेळ आणि खिलाडूवृत्तीमुळे ह्रतीकने आपला एक स्पोर्टी लुक निर्माण केलाय.... मात्र हॉट व्हील्ससाठी ह्रतिकचे हे प्रेम पाहून उपस्थित आणि मिडीयाच्या प्रतीनिधीनही आश्चर्याचा सुखद धक्का बसला....यानिमित्ताने ह्रितिकचे एक गुपितही आम्हाला समजलं.....बालपणी ह्रतिकची पहिली कमाई १०० रुपये मिळाली होती.

त्यावेळी आपल्या आई वडिलापासून लपतछपत त्याने हे पैसे गेम झोनमधेय जाऊन हॉट व्हील्सवर खर्च केले होते... विश्वास नसेल बसला मात्र खुद्द हृतिकनेच ही गोष्ट सांगितली होती. ह्रतिकचा हा स्पोर्टी अंदाज, खेळाचा थरार आणि जोश-उत्साह आपण 'धूम' तसंच 'क्रिश' 'वॉर' सारख्या सिनेमात पाहिलाय. 
 

Web Title: Do You Know Hritik Roshan's FIRST Salary REVEALED

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.