रिचा चड्डाने दिवाळीच्या निमित्ताने शेअर केलेली ही फनी पोस्ट झाली व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 01:00 PM2019-10-26T13:00:22+5:302019-10-26T13:01:39+5:30

रिचा चड्डाने दिवाळीसंबंधित एक पोस्ट केली असून ही पोस्ट तिच्या फॅन्सना प्रचंड आवडत आहे.

Diwali: Richa Chadha's cleaning meme is sure to crack you up! | रिचा चड्डाने दिवाळीच्या निमित्ताने शेअर केलेली ही फनी पोस्ट झाली व्हायरल

रिचा चड्डाने दिवाळीच्या निमित्ताने शेअर केलेली ही फनी पोस्ट झाली व्हायरल

googlenewsNext
ठळक मुद्देमी दिवाळीच्या सफाईला सुरुवात केली आणि जेव्हा माझी सफाई करून पूर्ण झाली तेव्हा... असे कॅप्शन देत तिने दोन व्हिडिओ शेअर केले आहेत. पहिल्या व्हिडिओत ती कचरा काढताना दिसत आहे तर दुसऱ्या व्हिडिओत ती रडकुंडीला आलेली असून जमिनिवरील वस्तू गोळा करताना दिसत आहे.

दिवाळी या सणाला सुरुवात झाली असून बॉलिवूडमधील सेलिब्रेटीदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून सेलिब्रेटी दिवाळी कशी साजरी करत आहेत याविषयी आपल्या चाहत्यांना सांगत आहेत. पण या सगळ्यात अभिनेत्री रिचा चड्डाने दिवाळीसंबंधित एक पोस्ट केली आहे. ही पोस्ट तिच्या फॅन्सना प्रचंड आवडत असून दिवाळीत आमची देखील या पोस्टप्रमाणेच अवस्था होते असे ते कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत.

रिचा चड्डा सोशल मीडियावर चांगलीच ॲक्टिव्ह आहे. ती सोशल मीडियावर तिचे फोटो, व्हिडिओ नेहमीच पोस्ट करत असते. तिने नुकत्याच केलेल्या एका पोस्टची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. यात आपल्याला रिचाचे दोन रूप पाहायला मिळत आहेत. मी दिवाळीच्या सफाईला सुरुवात केली आणि जेव्हा माझी सफाई करून पूर्ण झाली तेव्हा... असे कॅप्शन देत तिने दोन व्हिडिओ शेअर केले आहेत. पहिल्या व्हिडिओत ती कचरा काढताना दिसत आहे तर दुसऱ्या व्हिडिओत ती रडकुंडीला आलेली असून जमिनिवरील वस्तू गोळा करताना दिसत आहे. यासोबत तिने कॅप्शन लिहिले आहे की, या संपूर्ण आठवडाभर माझी अवस्था अशी असणार आहे.

रिचाचा हा फनी व्हिडिओ तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर केवळ एका दिवसांत 80 हजाराहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. आमची दिवाळीत अशीच अवस्था असते असे चाहते तिला प्रतिक्रियांच्या माध्यमातून सांगत आहेत तर तिच्या एका फॅनने कमेंटमध्ये लिहिले आहे की, ही पोस्ट 100 टक्के बरोबर आहे. माझ्या आईने मला गेल्या शनिवारी अशाचप्रकारे काम करायला लावले, त्यावेळी माझी अवस्था अशीच झाली होती. 

Web Title: Diwali: Richa Chadha's cleaning meme is sure to crack you up!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.