रामलीलामध्ये 5 रुपयांत गाणं गायचा सोनू निगम; दिव्या कुमारचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 11:47 AM2020-06-25T11:47:32+5:302020-06-25T12:17:50+5:30

सोनू निगम दिल्लीतील रामलीलामध्ये पाच रुपयांमध्ये गायचा.

Divya khosla kumar responds to sonu nigam warning husband bhushan kumar | रामलीलामध्ये 5 रुपयांत गाणं गायचा सोनू निगम; दिव्या कुमारचा पलटवार

रामलीलामध्ये 5 रुपयांत गाणं गायचा सोनू निगम; दिव्या कुमारचा पलटवार

googlenewsNext

टी-सीरिजचा मालक भूषण कुमार यांची पत्नी दिव्या खोसला कुमारने पुन्हा एकदा सोनू निमगवर निशाणा साधला आहे. तिने इन्स्टाग्रामवर एका व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात तिने सोनू निमगने भूषण कुमारवर केलेल्या आरोपांचे उत्तर दिले आहे. 

दिव्या खोसला कुमार या व्हिडीओमध्ये म्हणतेय, गुलशन कुमार यांच्या निधनानंतर भूषण कुमारने सोनू निगमकडे मदत मागितली होती. त्यावेळी भूषण खूप लहान होते पण सोनू निगमने मदत करण्याऐवजी दुसर्‍या कंपनीशी करार केला. 

दिव्या पुढे म्हणते की सोनू निगमने आजवर आपल्याशिवाय इतर कोणत्याही गायकाला संधी दिली नाही. पण टी-सीरिजमध्ये काम करणारे 97 टक्के लोक बाहेरचे आहेत. सोनू निगम दिल्लीतील रामलीलामध्ये पाच रुपयांमध्ये गायचा. त्यावेळी, गुलशन कुमार यांनी त्याच्यातील प्रतिभा ओळखली आणि त्याला संधी दिली.गुलशन कुमार यांच्या हत्येनंतर सोनू निगम दुसर्‍या कंपनीसोबत काम करु लागला. तेव्हा भूषण कुमार 18 वर्षांचे होते आणि त्यांनी सोनू निगमकडे मदत घेतली होती आणि आज ते या व्हिडिओद्वारे जगाला सांगितले जाते आहे.  

 दिव्या पुढे म्हणाली की, सोनू निगमने आपल्या व्हिडिओमध्ये म्हटले होते की मीटूच्या माध्यमातून एका मुलीने भूषण कुमारवर आरोप केले आहेत. मीटू ही खूप चांगली चळवळ होती परंतु बर्‍याच लोकांनी त्याचा गैरफायदा घेतला. त्यावेळी आमच्यावर  बरेच आरोप लावण्यात आले होते पण आम्ही पोलिसांची मदत घेतली. बर्‍याच मुलींचा हे कबुल पण केले होते की, त्यांनी दुसर्‍याच्या सांगण्यावरून असे केले आहे. आज सोनू निगमही याचा गोष्टीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करीत आहे.

दिव्या म्हणाली की, सोनू निगम दुसऱ्या कलाकारांना आपल्या सोबत घेऊन टी-सीरिजला संपवण्याचा प्रयत्न करतो आहे. तुझ्या पत्नीने तुझ्यावर आरोप लावले होते. दिव्या म्हणाली, माझ्या पती आणि मुलाला जिवे मारण्याची धमकी दिली जात आहे. याआधी दिव्याने इन्स्टास्टोरीच्या माध्यमातून सोनू निमगचा आरोपांचे उत्तर दिले होते. 

Read in English

Web Title: Divya khosla kumar responds to sonu nigam warning husband bhushan kumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.