दिव्या भारतीइतकीच सुंदर आहे तिची बहीण, पाहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2019 02:00 PM2019-12-28T14:00:07+5:302019-12-28T14:03:29+5:30

दिव्याच्या अभिनयाचे, सौंदर्याचे आजही अनेक चाहते आहेत. तिच्या इतकीच तिची बहीण देखील अतिशय सुंदर आहे.

divya bharti sister Kainaat Arora is new hot sensation, See her pics | दिव्या भारतीइतकीच सुंदर आहे तिची बहीण, पाहा तिचे फोटो

दिव्या भारतीइतकीच सुंदर आहे तिची बहीण, पाहा तिचे फोटो

googlenewsNext
ठळक मुद्देकायनातने तिच्या बहिणीप्रमाणेच चित्रपटांत देखील काम केले आहे. खट्टा मिठा या चित्रपटातील आयला रे आयला या आयटम साँगमध्ये ती झळकली होती.

बॉलिवूड अभिनेत्री दिव्या भारती सुंदर अभिनेत्रींपैकी एक असून तिने तिच्या लूक्स आणि निरागसतेने रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. तीन वर्षांच्या छोट्या सिने कारकिर्दीत दिव्या भारतीने अनेक सुपरहिट सिनेमे दिले होते. वयाच्या १९व्या वर्षी अपार्टमेंटच्या खिडकीतून पडून दिव्याचा मृत्यू झाला होता. तिच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न निर्माण झाले होते. ५ एप्रिल १९९३ रोजी जवळपास रात्री ११ वाजता अचानक दिव्या भारतीचे निधन झाले. दिव्या मुंबईतील वर्सोवा येथील तिच्या पाचव्या मजल्यावरील अपार्टमेंटच्या बाल्कनीतून पडली. सकाळपर्यंत दिव्याच्या निधनाचे वृत्त सिनेइंडस्ट्रीत पसरलं. दोन दिवसानंतर दिव्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या निधनानंतर असंख्य प्रश्न उभे ठाकले होते.

दिव्याच्या निधनाला अनेक वर्षं झाले असले तरी तिची लोकप्रियता आजही कमी झालेली नाही. तिच्या अभिनयाचे, सौंदर्याचे आजही अनेक चाहते आहेत. तिच्या इतकीच तिची बहीण देखील अतिशय सुंदर आहे. सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो आपल्याला पाहायला मिळतात. तिच्या बहिणीचे नाव कायनात अरोरा असून तिच्या सौंदर्याची चर्चा नेहमीच सोशल मीडियावर रंगते. 

कायनातने तिच्या बहिणीप्रमाणेच चित्रपटांत देखील काम केले आहे. खट्टा मिठा या चित्रपटातील आयला रे आयला या आयटम साँगमध्ये ती झळकली होती. तसेच ग्रँड मस्ती या चित्रपटात तिने काम केले होते. कायनातने मॉडलिंगद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली.

ती दिव्याची चुलत बहीण असून तिने कॅडबरी, मारूती, लक्स यांसारख्या अनेक प्रसिद्ध ब्रँडच्या जाहिरातींमध्ये काम केले आहे. तिने हिंदी सोबतच काही मल्याळी आणि पंजाबी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. 

Web Title: divya bharti sister Kainaat Arora is new hot sensation, See her pics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.