ठळक मुद्देशोला और शबनम या चित्रपटाच्या सेटवर दिव्या आणि साजिद यांची पहिली भेट झाली होती. साजिद आणि गोविंदा खूप चांगले फ्रेंड्स होते. गोविंदाला भेटण्यासाठी साजिद शोला और शबनमच्या सेटवर गेला होता. त्यावेळी दिव्या आणि साजिदची ओळख झाली आणि त्याचं प्रेमात रूपांतर झाले.

बॉलिवूड अभिनेत्री दिव्या भारती सुंदर अभिनेत्रींपैकी एक असून तिने तिच्या लूक्स आणि निरागसतेने रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. तीन वर्षांच्या छोट्या सिने कारकिर्दीत दिव्या भारतीने अनेक सुपरहिट सिनेमे दिले होते. वयाच्या १९ व्या वर्षी अपार्टमेंटच्या खिडकीतून पडून दिव्याचा मृत्यू झाला होता. तिच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न निर्माण झाले होते. ५ एप्रिल १९९३ रोजी जवळपास रात्री ११ वाजता अचानक दिव्या भारतीचे निधन झाले. दिव्या मुंबईतील वर्सोवा येथील तिच्या पाचव्या मजल्यावरील अपार्टमेंटच्या बाल्कनीतून पडली. सकाळपर्यंत दिव्याच्या निधनाचे वृत्त सिनेइंडस्ट्रीत पसरलं. दोन दिवसानंतर दिव्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या निधनानंतर असंख्य प्रश्न उभे ठाकले होते.

दिव्या भारतीचा आज म्हणजेच 25 फेब्रुवारीला वाढदिवस असून तिच्या कुटुंबियातील कोणाचाच या क्षेत्राशी संबंध नव्हता. पण खूपच कमी वयात तिने अभिनयक्षेत्रात प्रवास केला. तिने बॉलिवूडवर अनेक वर्षं राज्य केले असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. दिव्या भारतीचे लग्न निर्माता साजिद नाडियावालासोबत झाले होते. त्यांची पहिली भेट कशी झाली होती हे खूपच इंटरेस्टिंग आहे. शोला और शबनम या चित्रपटाच्या सेटवर दिव्या आणि साजिद यांची पहिली भेट झाली होती. साजिद आणि गोविंदा खूप चांगले फ्रेंड्स होते. गोविंदाला भेटण्यासाठी साजिद शोला और शबनमच्या सेटवर गेला होता. त्यावेळी दिव्या आणि साजिदची ओळख झाली आणि त्याचं प्रेमात रूपांतर झाले.

साजिद आणि दिव्या यांनी अतिशय साधेपणाने केवळ काही लोकांच्या उपस्थितीत लग्न केले होते. लग्नात दिव्याची मैत्रीण संध्या, तिचा नवरा यांसारखे काहीच लोक हजर होते. साजिद मुलसमान असल्याने तिने लग्न करण्यासाठी मुसलमान धर्म स्वीकारला होता. तिने तिचे नाव बदलून सना नाडियाडवाला ठेवले होते. 

दिव्याच्या निधनाला अनेक वर्षं झाले असले तरी तिची लोकप्रियता आजही कमी झालेली नाही. तिच्या अभिनयाचे, सौंदर्याचे आजही अनेक चाहते आहेत.


 

Web Title: Divya Bharti And Sajid Nadiadwala's Love Story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.