ठळक मुद्देदिशाने ‘एम.एस. धोनी - द अनटोल्ड स्टोरी’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले'मलंग’मध्ये दिशा आणि आदित्य स्क्रीन शेअर करणार आहेत

दिशा पटानी आज आपला वाढदिवस साजरा करतेय. सध्या दिशा आगामी सिनेमा 'मलंग'च्या शूटिंगमध्ये बिझी आहे. त्यामुळे दिशाने कोणती ग्रँड पार्टीचे आयोजन केले नाही. आजतकच्या रिपोर्टनुसार दिशा मित्रांसोबत डिनरला जाणार आहे. एका मुलाखती दरम्यान दिशाला विचारण्यात आले होतो की, डिनर पार्टीमध्ये तिचा जवळचा मित्र टायगर श्रॉफपण असणार आहे का ? यावर दिशा म्हणाली यावर आता काही बोलणं घाई होऊल. कारण अजूनपर्यंत कोणता प्लान फायनल झालेला नाही. पुढे ती म्हणाली, सध्या मी मलंगचे शूटिंग करतेय. त्यामुळे रात्री उशीरापर्यंत पार्टी करु शकत नाही. मी फक्त मित्रांसोबत डिनरला जाणार आहे. 'भारत' सिनेमाच्या यशामुळे दिशाचा बर्थडे खूप स्पेशल झाला आहे. 


दिशाने ‘एम.एस. धोनी - द अनटोल्ड स्टोरी’ या सिनेमातून  हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले होते. त्याआधी ‘लोफर’ या तेलुगू सिनेमातून दिशाने अभिनयाची इनिंग सुरु केली होती. यानंतर जॅकी चॅनसह ‘कूंग फू योगा’ या सिनेमात ती झळकली होती.

पुढे ‘बागी-२’ सिनेमातही दिशाच्या अभिनयाची जादू पाहायला मिळाली होती.‘बागी-२’ मध्ये दिशा आणि टायगर श्रॉफची जोडी रसिकांना भावली होती. 


मोहित सुरी दिग्दर्शित ‘मलंग’ या चित्रपटामध्ये दिशा आणि आदित्य स्क्रीन शेअर करणार आहेत. त्यांच्यासोबत अभिनेता अनिल कपूर आणि कुणाल खेमूदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.


Web Title: Disha patani reveals about her birthday plan
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.