ठळक मुद्देगेल्या अनेक दिवसांपासून टायगर व दिशा रिलेशनशिपमध्ये आहे. त्यांचे नाते आता कुणापासूनही लपलेले नाही.

बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री दिशा पाटनी सध्या ‘भारत’च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. या चित्रपटात दिशा प्रथमच सलमान खानसोबत ऑनस्क्रीन रोमान्स करताना दिसणर आहे. तूर्तास दिशाबद्दलची एक खास बातमी आहे. होय, दिशाला अलीकडे ‘मर्डर 4’ हा चित्रपट ऑफर  केला गेला. पण दिशाने म्हणे या चित्रपटास नकार दिला. कारण काय तर टायगर श्रॉफ. 
खरे तर ‘मर्डर’सारख्या सुपरहिट फ्रेन्चाइजीच्या चित्रपटाला नकार द्यायला हिंमत लागते. पण दिशाने हा नकार दिला. शेवटी तिला टायगरची मर्जी जी सांभाळायची होती. होय, ताजी खबर खरी मानाल तर ‘मर्डर 4’ची ऑफर आली आणि दिशाची या चित्रपटाच्या मेकर्ससोबत मीटिंगही ठरली. पण अचानक टायगर मध्ये आला नि दिशाने हा चित्रपट करण्यास थेट नकार कळवला.

आता असे का, तर याचेही कारण समोर आले आहे. ‘मर्डर’ फ्रेन्चाइजीचे सगळे चित्रपट किसींग आणि इंटिमेट सीनसाठी ओळखले जातात. दिशाने ‘मर्डर 4’ साईन केला असता तर साहजिकच तिलाही या बोल्ड चित्रपटात बोल्ड सीन्स द्यावे लागले असते आणि दिशा स्क्रिनवर इतके बोल्ड सीन देताना टायगरला पाहावले नसते. त्यामुळे टायगरने दिशाला हा चित्रपट साईन न करण्याची गळ घातली आणि दिशाने लगेच मान डोलवली. यापूर्वी टायगरच्या म्हणण्यानुसार, दिशाने चित्रपटात कधीही किसींग सीन न करण्याचा निर्णय घेतल्याची बातमी आली होती.


गेल्या अनेक दिवसांपासून टायगर व दिशा रिलेशनशिपमध्ये आहे. त्यांचे नाते आता कुणापासूनही लपलेले नाही. अद्याप दोघांनीही आपल्या या रिलेशनशिपबद्दल अधिकृत घोषणा केलेली नसली तरी लोकांना कळायचे ते कळून चुकलेय.


Web Title: disha patani refuses to work in mukesh bhatts film murder 4
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.