ठळक मुद्देसध्या दिशा ‘मलंग’ या चित्रपटात बिझी आहे. मोहित सूरी दिग्दर्शित या चित्रपटात दिशासोबत आदित्य राय कपूर, अनिल कपूर व कुणाल खेमू लीड भूमिकेत आहेत.

 बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. स्वत:चे रोज नवे फोटो, व्हिडीओ ती शेअर करते. तिचा ताजा व्हिडीओही असाच. या स्टंट व्हिडीओत ती किकसोबत जंप करताना  दिसतेय.
दिशाने हा व्हिडीओ शेअर केला आणि लगेच तो व्हायरल झाला. चाहत्यांनी त्यावर एकापेक्षा एक भारी कमेंट्स दिल्यात. यातल्या काही कमेंट्स चांगल्याच मजेशीर आहेत. एका युजरने दिशाचा हा व्हिडीओ पाहून ‘टायगर श्रॉफचे साईड इफेट्स’ अशी कमेंट दिली. तर अन्य एका युजरने ‘वंडर गर्ल’ असे लिहिले.


आता युजरने टायगर श्रॉफचे साईड इफेट्स असे का लिहिले असेल, हे तुम्ही जाणताच. दिशा व टायगर दोघेही दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. त्यांचे नाते आताश: कुणापासूनही लपलेले नाही. टायगर श्रॉफ त्याच्या स्टंटसाठी ओळखला जातो. त्याच्यासोबत राहून राहून दिशाही स्टंट करायला लागली, असे या युजरला म्हणायचे.

अर्थात दिशाचे हे स्टंटप्रेम टायगरमुळे आलेले नाही. दिशाने जिमनॅस्टिक आणि मिस्क मार्शल आर्टचे ट्रेनिंग घेतले आहे. फावल्या वेळेत ती याची प्रॅक्टिस करत असते. कदाचित याचमुळे टायगर दिशावर भाळला, असेही असू शकते.


दिशाने २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. हा चित्रपट भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या जीवनावर आधारित होता. यानंतर दिशाने मागे वळून पाहिले नाही.
सध्या दिशा ‘मलंग’ या चित्रपटात बिझी आहे. मोहित सूरी दिग्दर्शित या चित्रपटात दिशासोबत आदित्य राय कपूर, अनिल कपूर व कुणाल खेमू लीड भूमिकेत आहेत. 2020 मध्ये व्हॅलेन्टाईन डेच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होतोय.


Web Title: disha patani instagram stunt video and users reaction is viral
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.