director debamitra said athiya shetty crying saw end results motichoor chaknachoor | OMG! ‘मोतीचूर चकनाचूर’चे स्वप्न ‘चकनाचूर’, रिलीजआधीच रडू लागली होती अथिया शेट्टी
OMG! ‘मोतीचूर चकनाचूर’चे स्वप्न ‘चकनाचूर’, रिलीजआधीच रडू लागली होती अथिया शेट्टी

ठळक मुद्दे‘मोतीचूर चकनाचूर’ची दिग्दर्शिका देबमित्राने निर्माते राजेश भाटियावर गंभीर आरोप केलेत.

मोतीचूर चकनाचूर’ हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आणि बॉक्स ऑफिसवर दणकून आपटला. नवाजुद्दीन सिद्दीकीसारखा मुरलेला अभिनेताही हा चित्रपट फ्लॉप होण्यापासून वाचवू शकला नाही. सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी व नवाजुद्दीन सिद्दीकी या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. खरे तर ‘मोतीचूर चकनाचूर’ हा सिनेमा ‘चकनाचूर’ होणार याची कल्पना स्टारकास्टलाही आली होती. अथिया तर चित्रपट पाहून चक्क रडू लागली होती. या चित्रपटाची दिग्दर्शिका देबमित्रा बिस्वाल  हिने हा खुलासा केला आहे.

स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत देबमित्रा बोलली. ‘मोतीचूर चकनाचूर’च्या निर्मात्यांवर तिने धक्कादायक आरोप केलेत. निर्मात्यांनी चित्रपटाची वाट लावली, असे ती म्हणाली. इतकेच नव्हे तर चित्रपटाची लीड हिरोईन अथिया हिने  चित्रपट पाहिल्यानंतर दिलेल्या प्रतिक्रियेबद्दलही तिने सांगितले. तिने सांगितले की, ‘अथियाने रिलीजआधी चित्रपट बघितला तेव्हा तिला मोठा धक्का बसला होता. चित्रपट खूप वाईट आहे. हा रिलीज व्हायला नको, असे ती म्हणाली होती. चित्रपट बघितला त्यादिवशी ती अक्षरश: रडली होती.’

दिग्दर्शिकेने निर्मात्यांवर केले आरोप
‘मोतीचूर चकनाचूर’ची दिग्दर्शिका देबमित्राने निर्माते राजेश भाटियावर गंभीर आरोप केलेत. तिने सांगितले की, कोर्टाच्या आदेशानंतर मला चित्रपट दाखवला गेला. चित्रपट पाहिल्यानंतर मला धक्काच बसला. चित्रपटाची कथा अख्खी बदलली गेली होती. मी दिग्दर्शित केलेली ती ही कथा नव्हतीच. राजेश भाटियांनी अनेक सीन्स कापले, अनावश्यक शॉट्सचा वापर केला. सरतेशेवटी चित्रपटात काहीही नव्हते. सी ग्रेड भोजपुरी चित्रपटासारखा चित्रपट मी पाहत होते. निर्मात्यांनी माझा चित्रपट आणि माझे करिअर दोन्ही उद्धवस्त केले.
 

Web Title: director debamitra said athiya shetty crying saw end results motichoor chaknachoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.