'राधे'मधील 'दिल दे दिया' गाणं झालं रिलीज, सलमान खान आणि जॅकलीन फर्नांडिजची दमदार केमिस्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 04:01 PM2021-04-30T16:01:43+5:302021-04-30T16:02:38+5:30

सलमान खानच्या आगामी 'राधे'मधील बहुप्रतीक्षित गाणे 'दिल दे दिया' आज प्रदर्शित करण्यात आले आहे.

'Dil De Diya' song released from 'Radhe', Salman Khan and Jacqueline Fernandez's powerful chemistry | 'राधे'मधील 'दिल दे दिया' गाणं झालं रिलीज, सलमान खान आणि जॅकलीन फर्नांडिजची दमदार केमिस्ट्री

'राधे'मधील 'दिल दे दिया' गाणं झालं रिलीज, सलमान खान आणि जॅकलीन फर्नांडिजची दमदार केमिस्ट्री

googlenewsNext

सलमान खानच्या आगामी 'राधे'मधील बहुप्रतीक्षित डांस नंबर 'दिल दे दिया' आज प्रदर्शित करण्यात आले. या पॉवर-पॅक डान्स ट्रॅकमध्ये सलमान खान आणि जॅकलीन फर्नांडीज दिसणार आहेत. जॅकलीन आणि सलमान मधली सिझलिंग केमिस्ट्री प्रेक्षकांना आपल्या तालावर थिरकायला लावण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. 


या गाण्याबाबत जॅकलिन फर्नांडिस म्हणाली की, जेव्हा पण सलमान आणि मी एकत्र काम करत असतो, ते सर्वोत्तम असते. त्याची एनर्जी दमदार असते. ‘राधे’मधले ‘दिल दे दिया’ माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक आहे. हे माझ्या आधीच्या डांस नंबरहून पूर्णपणे वेगळे आहे. यासोबतच, डांसिंग लेजेंड प्रभुदेवा सरांद्वारे लेन्समागून आम्हाला दिग्दर्शित करताना बघणे हा एक जबरदस्त अनुभव होता. आम्ही या गाण्याच्या शूटिंगदरम्यान खूप एन्जॉय केले. मी केवळ हे करू इच्छित होते आणि मी हे प्रेक्षकांना दाखवण्यासाठी फार उत्सुक आहे.


‘राधे’चे दिग्दर्शक प्रभुदेवाने देखील जॅकलिनबाबत सांगितले की, "स्क्रीनवर जॅकलिनचे ग्लॅमर आणि व्यक्तिमत्व सर्वात वेगळे आहे आणि हे प्रत्येकाला माहिती आहे. या गाण्यासाठी ती आमची एकमेव पसंती होती. मला माहिती होते कि ती अभूतपूर्व काम करेल आणि आम्ही निश्चितपणे मिळालेल्या आउटपुटने रोमांचित झालो आहोत. तिने कोरियोग्राफीला पूर्ण न्याय दिला आहे आणि मला आशा आहे की हे सगळ्यांना आवडेल." 


हिमेश रेशमियाने या गाण्याला संगीत दिले असून शब्बीर अहमद याचे गीतकार आहेत. हे गाणे, कमाल खान आणि पायल देव यांनी गायले असून शबीना खानने कोरियोग्राफ केले आहे.


सलमान खानसोबत, या चित्रपटात दिशा पटानी, रणदीप हुड्डा आणि जैकी श्रॉफ यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. ‘राधे: योर मोस्ट वांटेड भाई’ची निर्मिती सलमान खान फिल्म्सने झी स्टूडियोसोबत मिळून केली आहे. सलमा खान, सोहेल खान आणि रील लाइफ प्रोडक्शन प्राइवेट लिमिटेड द्वारे निर्मित, हा चित्रपट या वर्षी ईदच्या मुहूर्तावर १३ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाला झी5 वर 'पे-पर-व्यू' सर्विस झी प्लेक्सवर देखील पाहता येईल. झी प्लेक्स डीटीएच प्लेटफॉर्म जसे की डिश, डी2एच, टाटा स्काय आणि एयरटेल डिजिटल टीवी वर देखील उपलब्ध असेल. 

Web Title: 'Dil De Diya' song released from 'Radhe', Salman Khan and Jacqueline Fernandez's powerful chemistry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.