did salman khan crops aishwarya rai bachchan while sharing a photo with sharmin sehgal of film hum dil de chuke saman |  सलमान खानने जपून ठेवलाय हा खास फोटो, पहिल्यांदा केला शेअर!!
 सलमान खानने जपून ठेवलाय हा खास फोटो, पहिल्यांदा केला शेअर!!

ठळक मुद्दे 1999मध्ये  ऐश्वर्या व सलमानचा ‘हम दिल दे चुके सनम’ सिनेमा रिलीज झाला होता. याच सेटवरचा हा फोटो आणि या फोटोतील क्रॉप केलेला चेहरा म्हणजे ऐश्वर्या.

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘मलाल’ या आगामी सिनेमाचा ट्रेलर  रिलीज झाला. तुम्हाला ठाऊक आहेच की, या सिनेमातून भन्साळींची भाची शर्मिन सेहगल आणि जावेद जाफरीचा मुलगा मिजान जाफरी बॉलिवूडमध्ये डेब्यू करताहेत. साहजिकच शर्मिन व मिजानच्या पहिल्यावहिल्या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी शर्मिन आणि मिजानला शुभेच्छा दिल्या. भाईजान सलमान खानही याला अपवाद नव्हता. सलमाननेही त्याच्या खास अंदाजात  शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छा देताना सलमानने ‘हम दिल दे चुके सनम’च्या सेटवरचा एक फोटो शेअर केला. पण हे काय? हा फोटो पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. कारण या फोटोतील एक चेहरा सलमानने जाणीवपूर्वक क्रॉप केलेला दिसला. आता हा चेहरा कुणाचा, हे आम्ही सांगण्याची गरज नाही. होय, ऐश्वर्या रायचा.
 1999मध्ये  ऐश्वर्या व सलमानचा ‘हम दिल दे चुके सनम’ सिनेमा रिलीज झाला होता. याच सेटवरचा हा फोटो आणि या फोटोतील क्रॉप केलेला चेहरा म्हणजे ऐश्वर्या. फोटोत सलमान, संजय लीला भन्साळी आणि लहानगी शर्मिन दिसत आहेत. सलमानच्या मागच्या बाजूला ऐश्वर्या उभी आहे. तिचा चेहरा दिसत नसला तरीही या तिच्या ड्रेसवरून ती ऐश्वर्याच असल्याचे स्पष्ट होते. कारण तिचा ड्रेस.

हाच ड्रेस तिने या सिनेमाच्या टायटल साँगमध्ये घातला होता. अर्थात हा फोटो शेअर करताना सलमानने ऐश्वर्याचा चेहरा क्रॉप केला आहे.सलमानने हा फोटो क्रॉप करून वापरला असला तरीही त्याच्या चाहत्यांच्या नजरेतून हा फोटो सुटला नाही. त्यामुळे सोशल मीडियावर चाहत्याच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
‘या फोटोमधील गोंडस लहान मुलगी शर्मिन आता सिल्व्हर स्क्रिनवर पाहण्याची वेळ झाली आहे. ‘मलाल’ पासून सुरू होत असलेल्या तुझ्या या प्रवासात तुला खूप सारे यश आणि प्रेम मिळो,’ असे सलमानने हा फोटो शेअर करताना लिहिले आहे.  


Web Title: did salman khan crops aishwarya rai bachchan while sharing a photo with sharmin sehgal of film hum dil de chuke saman
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.