Did 'PM Narendra Modi' actor Vivek Oberoi just end up promoting Salman Khan's 'Bharat'? | OMG! चक्क विवेक ऑबेरॉयने केले सलमान खानच्या भारतचे प्रमोशन, त्याच्या ट्वीटवर नेटकऱ्यांनी दिल्या मजेशीर प्रतिक्रिया
OMG! चक्क विवेक ऑबेरॉयने केले सलमान खानच्या भारतचे प्रमोशन, त्याच्या ट्वीटवर नेटकऱ्यांनी दिल्या मजेशीर प्रतिक्रिया

ठळक मुद्देसलमान लवकरच येतोय... सांभाळून राहा तसेच सलमानकडून पुन्हा तुला मार खायचा आहे का अशा मजेशीर प्रतिक्रिया लोकांनी त्याच्या ट्वीटला दिल्या. एवढेच नव्हे तर सलमानच्या चित्रपटाचे प्रमोशन केल्याबद्दल त्याचे नेटकऱ्यांनी आभार देखील मानले.

सलमान खान आणि विवेक ऑबेरॉय यांचे नाते कसे आहे हे आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. काही वर्षांपूर्वी ऐश्वर्या रायमुळे त्यांच्यात प्रचंड वाद रंगला होता. सलमान आजही त्या गोष्टी विसरला नसून त्याने अद्याप विवेकला माफ केलेले नाहीये. विवेक आणि सलमान यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून भांडणं असून देखील विवेकने सलमानच्या चित्रपटाचे प्रमोशन केले असे तुम्हाला कोणी सांगितले तर तुम्ही यावर विश्वास ठेवाल का? 

हो... असे नुकतेच घडले आहे. विवेकने सलमानच्या भारत या चित्रपटाचे नुकतेच ट्वीटरच्या माध्यमातून प्रमोशन केले. पण विवेकलाच ही गोष्ट कळली नाही. पण नेटकऱ्यांच्या हे लक्षात येताच त्यांनी विवेकची सोशल मीडियावर चांगलीच टर उडवली. 

लोकसभा निवडणुकीचे काल निकाल हाती आले असून लोकांनी भारतीय जनता पक्षाला आपला कौल दिला आहे. नरेंद्र मोदी हे भारताचे पुन्हा एकदा पंतप्रधान होणार असून अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचे अभिनंदन करत आहेत. पी. एम. नरेंद्र मोदी हा त्यांच्या जीवनावरील चित्रपट आजच प्रदर्शित झाला असून या चित्रपटात विवेक त्यांच्या भूमिकेत दिसला आहे. नरेंद्र मोदींना मिळालेल्या या यशासाठी विवेकने ट्वीटरद्वारे नुकत्याच त्यांना शुभेच्छा दिल्या. त्याने ट्वीटमध्ये म्हटले की, नरेंद्र मोदींचा तिरस्कार करणाऱ्यांसाठी विनंती आहे की त्यांचा द्वेष कमी करा आणि भारत वर अधिक प्रेम करा. सुदृढ लोकशाहीसाठी देशाला समंजस विरोधी पक्षाची गरज आहे.’ 

विवेकने हे ट्वीट करताना सलमान खानच्या भारत या आगामी चित्रपटाचे अप्रत्यक्षपणे प्रमोशन केले ही गोष्ट त्याच्या लक्षातच आली नाही. पण त्याची ही चूक त्याला नेटकऱ्यांनी लक्षात आणून दिली. सलमानच्या चित्रपटाचे विवेकने प्रमोशन केल्यामुळे नेटकऱ्यांनी विवेकची चांगलीच टर उडवली.


सलमान येतोय... सांभाळून राहा तसेच सलमानकडून पुन्हा तुला मार खायचा आहे का अशा मजेशीर प्रतिक्रिया लोकांनी त्याच्या ट्वीटला दिल्या. एवढेच नव्हे तर सलमानच्या चित्रपटाचे प्रमोशन केल्याबद्दल त्याचे नेटकऱ्यांनी आभार देखील मानले. 

 


Web Title: Did 'PM Narendra Modi' actor Vivek Oberoi just end up promoting Salman Khan's 'Bharat'?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.