ठळक मुद्देविवेक त्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी बायोपिक या आगामी चित्रपटाच्या पब्लिसिटीसाठी हे सगळे करत आहे. त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला ऐश्वर्याने अभिषेकला दिला.

लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच सरकार सत्तेवर येईल, असे रविवारी प्रसिद्ध झालेल्या विविध एक्झिट पोलमध्ये म्हटले गेले. साहजिकच एक्झिट पोलच्या या निकालानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पूर आला. विरोधकांची, एक्झिट पोलची खिल्ली उडवणारे अनेक मीम्स शेअर केले गेले. अभिनेता विवेक ओबेरॉय हाही याला अपवाद नव्हता. विवेकने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक्झिट पोलच्या पार्श्वभूमीवरचे एक मीम शेअर केले. पण त्याचे हे ट्वीट पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. कारण हे ट्वीट आणि हे मीम शेअर करताना त्याने केवळ एक्झिट पोलचीच नाही तर ऐश्वर्या राय बच्चन हिचीही खिल्ली उडवली.  

विवेकने ट्वीट केलेल्या मीम्समध्ये तीन फोटो आहेत. यातील पहिल्या सर्वात वरच्या फोटोत सलमान खान आणि ऐश्वर्या राय दिसतेय. या फोटोला ‘ओपिनियन पोल’ असे कॅप्शन देण्यात आले आहे. दुसऱ्या फोटोत ऐश्वर्या विवेक ओबेरॉयसोबत आहे. यावर ‘एक्झिट पोल’ असे लिहिलेले आहे. तिसऱ्या फोटोत ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन आणि आराध्याचा फोटो आहे आणि यावर ‘रिझल्ट’ असे लिहिले आहे. विवेकने हे मीम शेअर करताना त्यासोबत लाफिंग इमोजी पोस्ट केले होते. सोबत, ‘नो पॉलिटिक्स हिअर, जस्ट लाईफ’ असे लिहिले होते. या मीम्समुळे त्याला सोशल मीडियावर नेटिझन्सने प्रचंड सुनावले. एवढेच नव्हे तर महिला आयोगानेदेखील त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. या ट्वीटमुळे आपण चांगलेच वादात अडकलो आहे हे लक्षात येताच विवेकने हे ट्वीट डीलिट केले.

या ट्वीटवर बच्चन कुटुंबियातील कोणीच अद्याप काहीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये. पण टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, हे ट्वीट पाहून अभिषेक बच्चन प्रचंड भडकला होता. अभिषेक अतिशय शांत स्वभावाचा असून तो अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करणेच पसंत करतो. पण विवेकने ऐश्वर्याची खिल्ली उडवल्यामुळे तो चांगलाच चिडला होता आणि विवेकला सडेतोड उत्तर द्यायचे असे देखील त्याने ठरवले होते. पण त्याची पत्नी ऐश्वर्याने त्याला शांत केले. 

ऐश्वर्या सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हलला गेली असून तिथेच तिला या ट्वीटबद्दल कळले. तिने अभिषेकला सांगितले की, विवेक त्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी बायोपिक या आगामी चित्रपटाच्या पब्लिसिटीसाठी हे सगळे करत आहे. त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला ऐश्वर्याने अभिषेकला दिला.


Web Title: Did Aishwarya Rai Bachchan calm down a furious Abhishek Bachchan over Vivek Oberoi's offensive tweet?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.