धर्मेंद्र सांगतायेत, ही गोष्ट माहीत असती तर सनी देओलला निवडणूक लढवण्यापासून थांबवले असते

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 11:39 AM2019-05-13T11:39:21+5:302019-05-13T11:48:39+5:30

सनीने निवडणूक लढण्याचे ठरवल्यानंतर मी सनीला निवडणूक लढवण्यापासून थांबवले असते असे धर्मेंद्र यांनी म्हटले आहे. त्यांनी असे वक्तव्य करण्यामागे एक खास कारण आहे.

Dharmendra says he would not have let son contest polls had he known Sunil Jakhar is in the fray | धर्मेंद्र सांगतायेत, ही गोष्ट माहीत असती तर सनी देओलला निवडणूक लढवण्यापासून थांबवले असते

धर्मेंद्र सांगतायेत, ही गोष्ट माहीत असती तर सनी देओलला निवडणूक लढवण्यापासून थांबवले असते

googlenewsNext
ठळक मुद्देगुरदासपूरमध्ये सनीच्या विरोधात काँग्रेसचे सुनील जाखड उभे राहाणार हे माहीत असते तर मी सनीला निवडणूक लढण्यास परवानगी दिली नसती. सनी बलराम जाखड यांचा मुलगा सुनील याच्या विरोधात उभा आहे. माझे बलराम यांच्यासोबत खूप चांगले संबंध आहेत.

बॉलिवूड अभिनेता सनी देओलने भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर आता लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात तो उतरणार आहे. सनी देओललापंजाबमधील गुरुदासपूर मतदार संघातून भाजपाने उमेदवारी दिली आहे. सनी देओलने नुकताच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सनीने आपला उमेदवारी अर्ज भरताना पगडी परिधान केली होती. तसेच, त्याने अजय सिंह देओल या त्याच्या खऱ्या नावाने अर्ज दाखल केला. यावेळी त्याच्या भाऊ अभिनेता बॉबी देओल त्याच्यासोबत उपस्थित होता.



 

पण आता सनीने निवडणूक लढण्याचे ठरवल्यानंतर मी सनीला निवडणूक लढवण्यापासून थांबवले असते असे धर्मेंद्र यांनी म्हटले आहे. त्यांनी असे वक्तव्य करण्यामागे एक खास कारण आहे. धर्मेंद्र यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले आहे की, गुरदासपूरमध्ये सनीच्या विरोधात काँग्रेसचे सुनील जाखड उभे राहाणार हे माहीत असते तर मी सनीला निवडणूक लढण्यास परवानगी दिली नसती. मला गुरूदासपूर मध्ये आल्यावर कळले की, सनी बलराम जाखड यांचा मुलगा सुनील याच्या विरोधात उभा आहे. माझे बलराम यांच्यासोबत खूप चांगले संबंध आहेत. सुनील तर मला माझ्या मुलाप्रमाणेच आहे. 

२००४ मध्ये राजस्थान मधील चुरू मधून बलराम जाखड यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला होता. त्यानंतर धर्मेंद्र यांनी बिकानेरमधून निवडणूक लढवली आणि त्यांनी ही निवडणूक जिंकली होती. बलराम आणि त्यांच्या मैत्रीविषयी धर्मेंद्र सांगतात, मी राजकारणात आलो, त्यावेळी मला सुरुवातीला राजकारणाबद्दल काहीच कळत नव्हतं. त्यावेळी बलराम यांनीच मला मागदर्शन केले होते. बलराम निवडणुकीला उभा असताना मी त्याच्यासाठी प्रचार देखील केला आहे. सुनील निवडणूक लढणार याची कल्पना आम्हाला नव्हती. पण आता काहीही बदलू शकत नाही. आमच्यावर पक्षाने दिलेली जबाबदारी पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. तसेच प्रचारादरम्यान लोकांना देण्यात आलेली सगळी आश्वासनं आम्ही पूर्ण करणार आहोत. 

सनी देओल गेल्या आठवड्यात गुरूदासपूरला दाखल झाला. तो आता तिथे प्रचार करणार असून बॉबी देओल देखील त्याच्यासोबतच निवडणुकीपर्यंत तिथे राहाणार आहे. गुरूदासपुर येथे मतदान 19 मे ला होणार आहे. 



 

Web Title: Dharmendra says he would not have let son contest polls had he known Sunil Jakhar is in the fray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.