Dharmendra is doing farming right now, see his video | ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र सध्या करताहेत शेती, पहा त्यांचा हा व्हिडिओ
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र सध्या करताहेत शेती, पहा त्यांचा हा व्हिडिओ

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र सध्या आपल्या फार्म हाऊसवर असून ते अभिनय कारकीर्दीत करू न शकलेले काम सध्या करत आहेत. ते नेहमी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर फार्म हाऊसवरील व्हिडिओ शेअर करत असतात. त्या व्हिडिओत ते शेती करताना दिसतात तर कधी दुसरे काम करताना दिसतात. त्यांच्या या व्हिडिओला चाहत्यांची खूप पसंती मिळते.  

धर्मेंद्र यांनी इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओत ते कोरियर ग्रास कारपेट लावताना दिसत आहेत. या व्हिडिओसह ते म्हणाले की, तुमच्या सगळ्यांच्या प्रेमळ उत्तरांसाठी माझे खूप सारे प्रेम. पावलो पावली जीवन जगण्याच्या दिशेने... तुमच्या सगळ्यांसाठी प्रेरणा, जीवन प्रामाणिकपणे जगा, तुम्हाला भरपूर काही मिळेल. तुम्हाला सगळ्यांना खूप सारे प्रेम.


Web Title: Dharmendra is doing farming right now, see his video
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.