'झप्पी' अन् कानगोष्टी; संजय राऊत-अमिषा पटेल यांच्या भेटीचा VIDEO व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2022 05:41 PM2022-05-09T17:41:38+5:302022-05-09T17:54:09+5:30

Ameesha Patel-Sanjay Raut Video : शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. केवळ चित्रपटाचीच नव्हे तर या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटचीही सध्या जबरदस्त चर्चा रंगलीये.

dharamveer trailer launch Ameesha Patel hugs sanjay raut video viral | 'झप्पी' अन् कानगोष्टी; संजय राऊत-अमिषा पटेल यांच्या भेटीचा VIDEO व्हायरल

'झप्पी' अन् कानगोष्टी; संजय राऊत-अमिषा पटेल यांच्या भेटीचा VIDEO व्हायरल

googlenewsNext

 Ameesha Patel-Sanjay Raut Video : शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ ( Dharmveer - Mukkam Post Thane) या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. केवळ चित्रपटाचीच नव्हे तर या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटचीही सध्या जबरदस्त चर्चा रंगलीये. होय, या ट्रेलर लॉन्च इव्हेंटला मुख्यमंत्र्यांपासून शिवसेनेच्या अनेक बड्या नेत्यांची उपस्थिती होती. शिवाय बॉलिवूडचे अनेक बडे कलाकारही या सोहळ्याला हजर होते. अगदी भाईजान सलमान खानपासून जॅकी श्रॉफ, रितेश देशमुख, भाग्यश्री, गुलशन ग्रोव्हर अशा अनेक बॉलिवूड स्टार्सनी मुंबईत रंगलेल्या या सोहळ्याला हजेरी लावली. यादरम्यान  असं काही घडलं की, त्याचीही चर्चा झाली.

होय, बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेल  (Ameesha Patel) या सोहळ्याला आली. काळ्या स्टायलिश आऊटफिटमध्ये ती सोहळ्याला पोहोचली. प्रेक्षकांमध्ये पहिल्या रांगेत शिवसेनेचे खासदार संजय राऊत  (Sanjay Raut) बसलेले होते. त्यांना पाहताच अमीषानं त्यांना जादूची झप्पी दिली. सोबत काही कानगोष्टीही रंगल्या. या ‘झप्पी’ आणि कानगोष्टींची चर्चा झाली नसेल तर नवल.  अमिषानं याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या पोस्टमध्ये तिने संजय राऊतांना टॅगही केलं आहे.

‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाबद्दल सांगायचं तर  मराठीतील दिग्गज अभिनेता प्रसाद ओक या चित्रपटात धर्मवीर आनंद दीघेंची भूमिका जिवंत करणार आहे.

झी स्टुडिओज आणि मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्ट्सनं या चित्रपटाची निर्मिती केली आहे. प्रविण तरडे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. येत्या 13 मे रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

Web Title: dharamveer trailer launch Ameesha Patel hugs sanjay raut video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.