Dhaakad Box Office Collection: कंगना राणौतच्या धाकडने 8 व्या दिवशी 20 तिकिटे विकली, 4420 जमावला गल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 04:29 PM2022-05-28T16:29:07+5:302022-05-28T16:34:59+5:30

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिचा धाकड हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत केलेली कमाई अतिशय थक्क करणारी आहे.

Dhaakad box office collection kangana ranaut 20 tickets 4420 rupees day 8 | Dhaakad Box Office Collection: कंगना राणौतच्या धाकडने 8 व्या दिवशी 20 तिकिटे विकली, 4420 जमावला गल्ला

Dhaakad Box Office Collection: कंगना राणौतच्या धाकडने 8 व्या दिवशी 20 तिकिटे विकली, 4420 जमावला गल्ला

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिचा धाकड हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत केलेली कमाई अतिशय थक्क करणारी आहे. 'धाकड' चित्रपट रिलीज होऊन 9 दिवस पूर्ण झाले आहेत. या चित्रपटाच्या कमाईचा आकडा दिवसेंदिवस घसरत चाललै आहे. दरम्यान, आता धाकडचा 8व्या दिवसाचं कलेक्शन समोर आला आहे. या चित्रपटाने आठ दिवसांत काही खास कमाई केलेली नाही. पण 8व्या दिवशी सिनेमाने कमाईचा डाव आटोपता घेतला आहे.

धाकडने कमावले केवळ इतके पैसे
रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, 'धाकड'ची शुक्रवारी, 27 मे रोजी बॉक्स ऑफिसवर फक्त 20 तिकिटे विकली गेली होती. या दिवशी चित्रपटाने केवळ 4,420 रुपयांची कमाई केली. बॉलिवूडच्या कोणत्याही चित्रपटासोबत असे घडले असेल. धाकडमुळे कंगना राणौतलाही ट्रोलचा सामना करावा लागत आहे. कंगनाने आतापर्यंत सलग 9 फ्लॉप चित्रपट दिले आहेत.

चित्रपटाच्या बजेटबद्दल बोलायचे झाले तर हा 80 ते 90 कोटी रुपये खर्चून बनवण्यात आला आहे. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाच्या निर्मात्यांना ओटीटी आणि सॅटेलाइट अधिकार विकण्यातही अडचणी येत आहेत. चित्रपटाच्या निर्मात्यांनी रिलीजपूर्वी हे हक्क विकले नाहीत. हा चित्रपट मोठा हिट ठरेल आणि नंतर करार केल्यास फायदा होईल, असे निर्मात्यांना वाटत होते. आता चित्रपटाची खराब कमाई पाहता कोणीही चित्रपट विकत घ्यायला तयार नाही.

 धाकडने 6 दिवसांत केवळ 4 कोटी रुपये जमा केल्याचे सांगण्यात येत होते. आता या चित्रपटाची कमाई 5 कोटींवरही पोहोचणार नसल्याचे दिसते आहे. खरं तर कंगना आणि धाकडच्या टीमचं मोठं नुकसान होत आहे.

Web Title: Dhaakad box office collection kangana ranaut 20 tickets 4420 rupees day 8

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.