SEE PICS : देव आनंद यांच्या पुतण्याला 14 वर्षांच्या स्ट्रगलनंतर मिळाला पहिला ब्रेक!!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 02:35 PM2019-10-18T14:35:27+5:302019-10-18T14:37:26+5:30

बॉलिवूडमध्ये स्टार किड्सला अगदी सहज काम मिळते, हे खरे असले तरी पूर्ण सत्य नाही. होय, एकेकाळचे दिग्गज दिग्दर्शक विजय आनंद यांचा मुलगा आणि सुपरस्टार देव आनंद यांचा पुतण्या वैभव आनंद याचे उदाहरण असेच.

dev anand nephew vaibhav anand shared his struggle story | SEE PICS : देव आनंद यांच्या पुतण्याला 14 वर्षांच्या स्ट्रगलनंतर मिळाला पहिला ब्रेक!!

SEE PICS : देव आनंद यांच्या पुतण्याला 14 वर्षांच्या स्ट्रगलनंतर मिळाला पहिला ब्रेक!!

googlenewsNext
ठळक मुद्देया वेब सीरिजमध्ये वैभव मुख्य भूमिकेत नसला तरी ही संधी त्याला महत्त्वाची वाटते.

बॉलिवूडमध्ये स्टार किड्सला अगदी सहज काम मिळते, हे खरे असले तरी पूर्ण सत्य नाही. होय, एकेकाळचे दिग्गज दिग्दर्शक विजय आनंद यांचा मुलगा आणि सुपरस्टार देव आनंद यांचा पुतण्या वैभव आनंद याचे उदाहरण असेच. एक नाही, दोन नाही तर तब्बल 14 वर्षे स्ट्रगल केल्यानंतर वैभवला पहिला ब्रेक मिळाला आहे. एकता कपूरच्या ‘द वर्डिक्ट - नानावटी वर्सेस स्टेट’ या वेब सीरिजमध्ये वैभवची वर्णी लागली आहे. गत 30 सप्टेंबरला अल्ट बालाजीवर ही वेबसीरिज प्रसारित झाली. या वेब सीरिजसाठी मानधनापोटी वैभवला प्रतिदिन 18 हजार रूपये मिळाले.

वडिल विजय आनंद आणि काका देव आनंद यांच्या पावलावर पाऊल ठेवत वैभवने बॉलिवूडची वाट निवडली. गत 14 वर्षांत या इंडस्ट्रीत जम बसवण्याचे अनेक प्रयत्न त्याने केलेत. पण प्रत्येकवेळी त्याच्या पदरी निराशा पडली. 14 वर्षांत वैभवने 100 पेक्षा अधिक चित्रपटांसाठी ऑडिशन दिले. रवी चोप्रा व सूरज बडजात्या यांच्याकडे अस्टिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले. काही थ्रीलर चित्रपटांची कथाही त्याने लिहिली. हे चित्रपट त्याला दिग्दर्शित करायचे होते. पण निर्मात्यांनी त्याच्यावर विश्वास दाखवला नाही. अखेर अनेक वर्षांनंतर वैभवला एकता कपूरच्या वेब सीरिजमध्ये काम करण्याची संधी मिळाली. या वेब सीरिजमध्ये वैभव मुख्य भूमिकेत नसला तरी ही संधी त्याला महत्त्वाची वाटते.


‘दैनिक भास्कर’शी बोलताना वैभवने या स्ट्रगलबद्दल सांगितले. तो म्हणाला, माझ्या कुटुंबाच्या रक्तात अभिनय आहे. पण कुटुंबाच्या नावाचा वापर करून मला काहीही मिळवायचे नव्हते. वडिल मला एका चित्रपटातून लॉन्च करणार होते. पण त्याआधीच त्यांचे निधन झाले. काका देव आनंद यांनी अनेकांना माझे नाव सुचवले होते. सूरज बडजात्या यांनीही माझ्यासाठी एक चित्रपट प्लान केला होता. पण तो बनू शकला नाही. पाच वर्षांपूर्वी सलमान खानच्या बॅनरखाली ‘हॅपी डेज’मध्ये मला संधी मिळाली होती. पण कदाचित दिग्दर्शकाचा माझ्या नावाला विरोध होता. अजूनही माझा संघर्ष संपलेला नाही. अर्थात मी कधीही हार मानली नाही.

Web Title: dev anand nephew vaibhav anand shared his struggle story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.