देव आनंद यांनी शूटिंगदरम्यानच या अभिनेत्रीसोबत केलं होतं लग्न, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 06:00 AM2019-09-26T06:00:00+5:302019-09-26T06:00:00+5:30

देव आनंद यांनी चित्रपटाच्या सेटवरच या अभिनेत्री सोबत केलं होतं लग्न

Dev Anand Birthday Know About His Unknown Facts | देव आनंद यांनी शूटिंगदरम्यानच या अभिनेत्रीसोबत केलं होतं लग्न, वाचा सविस्तर

देव आनंद यांनी शूटिंगदरम्यानच या अभिनेत्रीसोबत केलं होतं लग्न, वाचा सविस्तर

googlenewsNext


साठच्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत राज कपूर, दिलीप कुमार व देव आनंद यांची चलती होती. एकीकडे दिलीप कुमार सीरियस भूमिका साकारणारे ट्रॅजेडी किंग होते तर राज कपूर खूपच चंचल भूमिका करत होते. मात्र रोमांस, स्टाईल व मनाला भिडणाऱ्या भूमिका फक्त देव आनंद यांनाच मिळायच्या. देव आनंद यांचे आजदेखील लाखो दीवाने आहेत. 


२६ सप्टेंबर, १९२३ रोजी देव आनंद यांचा जन्म झाला होता. देव आनंद यांचं खरं नाव धर्मदेव पिशोरिमल आनंद आहे. पण, त्यांना सगळे देव आनंद या नावानेच ओळखलं जातं होतं. त्याचा जन्म पंजाबमध्ये झाला होता. देव आनंद यांच्या घरातले चीरू असं संबोधयाचे.


देव आनंद यांनी त्यांच्या करियरची सुरूवात ८५ रुपये वेतनावर एका कंपनीतील अकाउंटंटच्या नोकरीतून केलं होतं. देव आनंद यांनी १९४६ साली 'हम एक हैं' या चित्रपटातून पदार्पण केलं होतं. 


देव आनंद यांची प्रेमकथा अर्धवट राहिली. त्यांचं पहिलं प्रेम सुरैया होती. विद्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सुरैया पाण्यात डुबत होती आणि देव आनंद यांनी त्यांच्या जीवाची पर्वा न करता तिला वाचवलं होतं. तिथूनच त्यांच्या प्रेमकथेला सुरूवात झाली होती.


जीत चित्रपटाच्या सेटवर देव आनंदने सुरैयाला ३००० रुपयांची हिऱ्यांची अंगठी देऊन प्रपोझ केलं होतं. मात्र सुरैयाची आजीला हे नातं मंजूर नव्हते. याचं सर्वात मोठं कारण होतं की देव आनंद हिंदू होते आणि सुरैया मुसलमान होती.


टॅक्सी ड्रायव्हर चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान देव आनंद या सिनेमातील त्याची सहकलाकार नवोदीत अभिनेत्री कल्पना कार्तिकच्या प्रेमात पडले आणि शूटिंगदरम्यान एक दिवस लंच ब्रेकमध्ये दोघांनी लग्न केलं. कल्पना शेवटच्या क्षणापर्यंत देव आनंद यांची पत्नी राहिली.

Web Title: Dev Anand Birthday Know About His Unknown Facts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.