सध्या प्रियांका चोप्रा पती निक जोनाससह मियामीमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहे.  या लव्हबर्डसोबत मियामीमध्ये जोनास ब्रदर्सही सुट्टायांचा आनंद  लुटत आहेत. प्रियांकाचा जोनास फॅमिलीसोबत डान्स करत असल्याचा व्हिडीओही समोर आला होता.  प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या लग्नाला  चार महिने  उलटले असूनही यांच्याविषयीच्या चर्चा थांबायला तयार नाहीत. प्रत्येक दिवशी दोघांविषयी जाणून घेण्यासाठी चाहतेही उत्सुक असतात.

त्यामुळे या लव्हबर्डच्या फोटोंना सोशल मीडियावर खूप पसंती मिळते. त्यांच्या आयुष्यात सुरू असलेल्या घडामोडी वाचण्यात फॅन्सनाही चांगलाच रस असतो. त्यामुळे सोशल मीडियार सध्या फक्त आणि फक्त प्रियांका आणि निक जोनास यांचाच बोलबाला असल्याचे पाहायला मिळत आहे.


 तसेच एकीकडे दोघे मस्त क्वॉलिटी टाईम एन्जॉय करत असल्याचे फोटो व्हायरल होत असताना दोघेही वेगळे होण्याच्या बातम्याही येऊ लागल्या आहेत. निक आणि प्रियांका यांच्यामध्ये सध्या वाद होत आहेत आणि दोघेही वेगळे होण्याचा विचार करत असल्याच्या चर्चा आहेत. दोघांनी लग्न करण्याची फार घाई केली आणि एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळच दिला नाही.

 

 

याच कारणामुळे त्यांच्यात छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होत असल्याचे बोलले जात आहेत. तसेच ज्याप्रमाणे प्रियांका आणि निक व्हॅकेशन एन्जॉय करत आहेत हे पाहून तरी त्यांच्या घटस्फोटाच्या बातमीत काहीही सत्यता नाही. ते दिघे एकमेकांसोबत खूप खुश आहेत आणि यावेळी मियामीमध्ये सासरच्यांसोबत व्हॅकेशन एन्जॉय करत आहे.


Web Title: Desi Girl Priyanka Chopra's Photos With Nick Jonas Why It's More Viral, That's Reason
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.