Delhi Violence : 'नागिन' म्हणणाऱ्यांवर स्वरा भास्करची जहरी टीका, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 12:17 PM2020-02-28T12:17:21+5:302020-02-28T12:18:00+5:30

नागिन म्हणणाऱ्यांवर आता स्वराने जहरी टीका केली आहे.

Delhi Violence: Troll Calls Swara Bhasker A Naagin She Hits Back At Poo Uncle Tjl | Delhi Violence : 'नागिन' म्हणणाऱ्यांवर स्वरा भास्करची जहरी टीका, वाचा सविस्तर

Delhi Violence : 'नागिन' म्हणणाऱ्यांवर स्वरा भास्करची जहरी टीका, वाचा सविस्तर

googlenewsNext


सोशल मीडियावर रोखठोक आपले मत व्यक्त करणारी अभिनेत्री स्वरा भास्कर पुन्हा एकदा ट्रोल झाली आहे. तिने सीएए कायद्यामुळे पेटलेल्या दिल्लीमध्ये हिंसक आंदोलनावर आपलं मत व्यक्त केलं आहे. त्यामुळे तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. इतकेच नाही तर या हिंसेला तिला जबाबदार ठरवत काहींनी तिला नागिन असे संबोधले आहे. नागिन म्हणणाऱ्यांवर आता स्वराने जहरी टीका केली आहे.


एका युजरने स्वरा भास्करला ट्रोल करत लिहिले की, नागिन हे तू डसल्यामुळे झाले आहे. दोन महिन्यांपासून ती विष पसरवते आहेस आणि आता दुःख झाल्याचं नाटक करत आहेत. एक दिवस तुला याची किंमत मोजावी लागले. देव सगळं पाहतो आहे. 


युजर स्वराच्या त्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना दिसले ज्यात ती हिंसा चुकीची असल्याचे सांगते आहे आणि कपिल मिश्राला जबाबदार ठरविते आहे.
स्वरादेखील सातत्याने ट्रोलर्सना तीव्र भाषेत उत्तर देताना दिसते आहे. स्वराने आपली बाजू मांडताना म्हटलं की, तुम्ही माझी काळजी करू नका अंकल. हे सगळे मृत्यू तुमच्या आयडॉलॉजीची देण आहे. एक दिवस ही आग सगळ्यांच्या घरापर्यंत येणार आणि हे सगळं तुमच्यामुळे होणार आहे.


यादरम्यान स्वराला समर्थन करणारे युजर्सही समोर आले. एका युजरने म्हटले की जर देव असता तर आतापर्यंत तुम्ही वाचले नसता. तर स्वराच्या विरोधात असणारे तिला समर्थन करणाऱ्यांवरही टीका करताना दिसले. एका विरोधकाने लिहिले की, देव नाही गुजरातवाला, सगळे सोलले जातील. सगळे.

Web Title: Delhi Violence: Troll Calls Swara Bhasker A Naagin She Hits Back At Poo Uncle Tjl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.