व्हाट्सअ‍ॅपवर ‘राधे’ शेअर करणार्‍यांची आता खैर नाही! हायकोर्टाने दिले हे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 12:45 PM2021-05-25T12:45:19+5:302021-05-25T12:46:25+5:30

‘राधे : योर मोस्ट वॉन्टेड भाई’  हा सिनेमा रिलीज झाला आणि काही तासांतच सिनेमाची पायरेटेड कॉपी व्हॉट्सअ‍ॅप व अन्य सोशल मीडिया माध्यमांवर फिरू लागली. झी 5 ने याविरोधात हायकोर्टात धाव घेतली होती.

delhi hc directs whatsapp to suspend services of users pirating salman khan film radhe your most wanted bhai | व्हाट्सअ‍ॅपवर ‘राधे’ शेअर करणार्‍यांची आता खैर नाही! हायकोर्टाने दिले हे निर्देश

व्हाट्सअ‍ॅपवर ‘राधे’ शेअर करणार्‍यांची आता खैर नाही! हायकोर्टाने दिले हे निर्देश

googlenewsNext
ठळक मुद्देईदच्या निमित्ताने गेल्या 13 मे रोजी सलमान खानचा बहुप्रतिक्षित सिनेमा ‘राधे-योर मोस्ट वॉन्टेड भाईजान’ रिलीज झाला.

सलमान खान ( Salman Khan) स्टारर ‘राधे : योर मोस्ट वॉन्टेड भाई’  (Radhe: Your Most Wanted Bhai)  हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला आणि काही तासांतच ऑनलाईन लीक झाला. सिनेमाची पायरेटेड कॉपी अगदी व्हॉट्सअ‍ॅप व अन्य सोशल मीडिया माध्यमांवर फिरू लागली. झी 5 ने याविरोधात हायकोर्टात धाव घेतली. यावर सुनावणी करताना दिल्ली हायकोर्टाने भाईजानच्या सिनेमाची पायरेटेड कॉपी विकणा-या युजर्सची सर्व्हिस बंद करण्याचे निर्देश व्हाट्सअ‍ॅपला दिले आहेत.
एअरटेल, जिओ, वोडाफोन या देशातील सर्व प्रमुख टेलिकॉम ऑटरेटर्सलाही  पायरसी करणा-या ग्राहकांची माहिती देण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. जेणेकरून झी5 या ग्राहकांविरूद्ध कायदेशीर कारवाई करू शकेल.

राधे’ची पायरेटेड कॉपी आणि विविध व्हिडिओ क्लिप  मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये पसरवल्या जात आहेत, असा आरोप झी-5ने आपल्या याचिकेत केला होता. यावर हायकोर्टाने उपरोक्त निर्देश दिलेत. चित्रपट बेकायदेशीरपणे सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित करण्यावर बंदी आणण्याचे हायकोर्टाने म्हटले.
ईदच्या निमित्ताने गेल्या 13 मे रोजी सलमान खानचा बहुप्रतिक्षित सिनेमा ‘राधे-योर मोस्ट वॉन्टेड भाईजान’ रिलीज झाला.  मात्र यादरम्यान काहींनी बेकायदेशीररित्या सिनेमाची पायरसी केली. यामुळे   सलमान चांगलाच संतापला होता.

प्रेक्षकांनी ‘राधे’   प्रेक्षकांनी योग्य प्लॅटफॉर्मवर सिनेमा पहावा अशी विनंती केली सलमानने आधीच केली होती. मात्र त्यानंतरही अनेक प्रेक्षकांनी बेकायदेशीर रित्या काही वेबसाईटवर उपलब्ध असलेला सिनेमा पाहिल्याने सलमान संतापला होता. पायरसीचा भाग बनू नका़ नाहीतर सायबर सेल तुमच्यावर कारवाई करेल, तुम्ही अडचणीत याल, अशी ताकिदच त्याने दिली होती.

Web Title: delhi hc directs whatsapp to suspend services of users pirating salman khan film radhe your most wanted bhai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.