Deepika Padukone's X Boyfriend will be caught in silk, with royal wedding | दीपिका पादुकोणचा एक्स बॉयफ्रेंडही अडकणार रेशीमगाठीत, असा असणार लग्नाचा शाही थाट
दीपिका पादुकोणचा एक्स बॉयफ्रेंडही अडकणार रेशीमगाठीत, असा असणार लग्नाचा शाही थाट

ठळक मुद्दे15 फेब्रुवारीला पारंपरिक पद्धतीने हे शुभमंगल पार पडणार आहे.नीती मोहन निहार पांड्यासह लग्नबंधनात अडकणारहैदराबादच्या ताज फलकनुमा पॅलेसमध्ये रंगणार हा विवाहसोहळा

आपल्या जोडीदारासह अनेकांनी जीवनाची नवी इनिंग सुरू करत नववर्षाची म्हणजेच २०१९ची सुरूवातसुद्धा सनई चौघडेनं केल्याचे पाहायला मिळाले. आगामी काळात अनेक सेलिब्रेटी लग्नबंधनात अडकणार आहेत. आपल्या मधुर आवाजाने रसिकांच्या मनात स्थान मिळवणारी गायिका नीती मोहनसुद्धा लवकरच विवाबंधनात अडकणार आहे. विशेष म्हणजे नीती मोहन ज्याच्या बरोबर सात जन्माच्या आणाभाका घेणार आहे तो बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणचा एक्स बॉयफ्रेंड आहे. निहार पांड्या असे त्याचे नाव आहे.


 
एकेकाळी दीपिका पादुकोणच्या प्रेमात पडला होता. काही कारणामुळे दीपिकाचे आणि निहार पांड्याचे बिनसले आणि दोघंही वेगळे झाले. आता तोच निहार पांड्या  नीती मोहनच्या प्रेमात पडला आणि आता हे दोघेही येत्या 15 फेब्रुवारीला आपल्या जीवनाचा नवा अध्याय सुरू करणार आहेत. विशेष म्हणजे आजपर्यंत नीतीने तिच्या खुल्लम खुल्ला प्रेमाची कबुली दिली नव्हती. थेट लग्नाची गुड न्युज शेअर करत चाहत्यांना तिने एक सुखद आश्चर्याचा धक्काच दिला असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. 

 

14 फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंडाईन डेच्या दिवशीच लग्नाच्या प्रि-सेलिब्रेशनला सुरूवात होणार आहे. आणि 15 फेब्रुवारीला हैदराबादच्या ताज फलकनुमा पॅलेस येथे पारंपरिक पद्धतीने हे शुभमंगल पार पडणार आहे. आपल्या जीवनातील हा सुंदर आणि खास सोहळा आयुष्यभर लक्षात राहावा यासाठी नीती मोहनने काही खास प्लॅनिंगही केले आहे. तुर्तास लग्नसोहळ्याला नवदाम्पत्याला शुभेच्छा देण्यासाठी  कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्र मंडळींसह  इंडस्ट्रीतील अनेक मान्यवरही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. रेशीमगाठीत अडकल्यानंतर नीती मोहनही लग्न झालेल्यांच्या क्लबमध्ये सामिल होणार हे मात्र नक्की. 

Web Title: Deepika Padukone's X Boyfriend will be caught in silk, with royal wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.