बॉलिवूडची मस्तानी म्हणजेच अभिनेत्री दीपिका पादुकोण शकुन बत्रा यांच्या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट खूप इंटरेस्टिंग असून माणूस व नाती यांच्यावर आधारलेला असल्याचे दीपिकाने सांगितले. 

दीपिका पादुकोणने नुकतेच एका मुलाखतीत शकुन बत्रा यांच्या आगामी सिनेमाबद्दल सांगितले. ती म्हणाली की, चित्रपटाची कहाणी माणसे आणि नाती यांच्याविषयी आणि वास्तविक आयुष्यात देखील हा भाग आपल्या मनाच्या जवळ आहे.

दीपिकाने तिच्या आणि दिग्दर्शकामध्ये असलेल्या चित्रपटांची समान आवड आणि इतर अनेक समान आवडी निवडींविषयी यावेळी सांगितले. याविषयी दीपिकाने सांगितले की, कशी ती शकुनसोबत काम करायला उत्सुक आहे, ज्याने कपूर अँड सन्सचे दिग्दर्शन केले होते आणि तो चित्रपट दीपिकाला प्रचंड आवडला होता, आणि हा चित्रपट देखील नाती आणि माणसे या समान कहाणीवर बेतला आहे.दीपिका आपल्या संपूर्ण टीम सोबत या चित्रपटाच्या शुटींगसाठी श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार होती, मात्र लॉकडाउनमुळे उद्भवलेली स्थिती सामान्य होईपर्यंत त्याला स्थगिती मिळाली आहे. या लॉकडाउननंतर, ती लगेचच दिग्दर्शक शकुन यांच्यासोबत चित्रपटाच्या शुटींगला सुरुवात करणार आहे. 

शकुन बत्रा यांच्या आगामी चित्रपटाचे नाव अजून गुलदस्त्यात असले तरीही दीपिका पादुकोण सोबत आपल्याला सिद्धान्त चतुर्वेदी आणि अनन्या पांडे ही यापूर्वी पडद्यावर कधीही न  दिसलेली तिकडी पाहता येणार आहे. हा चित्रपट 12 फेब्रुवारी, 2021 मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

Web Title: Deepika Padukone will be seen in Shakun Batra's upcoming movie, along with this cast TJL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.