Deepika padukone was the first choice for movie rockstar not nargis Fakri | 'रॉकस्टार'साठी नर्गिस फाखरी नाही तर बॉलिवूडची 'ही' अभिनेत्री होती पहिली पसंत!
'रॉकस्टार'साठी नर्गिस फाखरी नाही तर बॉलिवूडची 'ही' अभिनेत्री होती पहिली पसंत!

रॉकस्टार सिनेमात आपल्याला रणबीर कपूरच्या अपोझिट नर्गिस फाखरी आपल्याला दिसली होती. नर्गिसच्या वाटेला फारसे सिनेमे आले नाहीत. ती तिच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा पर्सनल लाईफला घेऊन जास्त चर्चेत राहिली. आजतकच्या रिपोर्टनुसार दिग्दर्शिक इम्तियाज अलीची रॉकस्टारसाठी पहिली पसंती नर्गिस नसून दीपिका पादुकोण होती.


इम्तियाज अलीने दीपिकासाठी लिहिलेल्या एक नोटमध्ये या गोष्टीचा उल्लेख करण्यात आला आहे. इम्तियाजने यात त्याच्या आणि दीपिकाच्या पहिल्या भेटीबाबत लिहिले आहे. ''हॉटेलच्या आवारात गाडीतून उतरताना तिने माझ्याकडे पाहिले. मला लगेच कळले की ही तिच मुलगी आहे जिला भेटण्यासाठी मी आलोय. तसेच तिला देखील कळले हा तोच दिग्दर्शक आहे ज्याला भेटण्यासाठी ती आलीय.''  पुढे तो लिहितो, तोपर्यंत दीपिकाचा एक ही सिनेमा रिलीज झाला नव्हता. मी तिला रॉकस्टार सिनेमा संदर्भात भेटायला गेलो होतो. मला रॉकस्टारमध्ये तिला कास्ट करायचे होते मात्र पुढच्या एकावर्षात तो तयार झाला नाही. मी इतर सिनेमांमध्ये तिच्यासोबत काम केले आहे.   


दीपिकाच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर, लवकरच ती छपाकमध्ये दिसणार आहे. या सिनेमाची कथा ऐकून दीपिका काहीशी भावूक झाली होती. 'छपाक' सिनेमा दीपिकाची भूमिका प्रचंड आव्हानात्मक असून सध्या ती या भूमिकेवर प्रचंड मेहनत घेत आहे. यात दीपिका अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडित लक्ष्मी अग्रवाल हिचा जीवन संघर्ष या सिनेमातून पडद्यावर दाखवण्यात येणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून दीपिका निर्मिती क्षेत्रात पदार्पण करतेय.  या सिनेमाचे दिग्दर्शन मेघना गुलजार करणार आहे. हा सिनेमा १० जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.


Web Title: Deepika padukone was the first choice for movie rockstar not nargis Fakri
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.