Deepika Padukone troll once again | ड्रेसिंग स्टाईलमुळे पुन्हा ट्रोल झाली दीपिका पादुकोण; ट्रोलर्स म्हणाले, ‘एकदा आरशात बघत जा’
ड्रेसिंग स्टाईलमुळे पुन्हा ट्रोल झाली दीपिका पादुकोण; ट्रोलर्स म्हणाले, ‘एकदा आरशात बघत जा’

 बॉलिवूडची मस्तानी गर्ल अभिनेत्री दीपिका पादुकोण ही तिचा फॅशन सेंस आणि स्टाईलमुळे चर्चेत असते. अलीकडेच ती एअरपोर्टवरच्या तिच्या लूकमुळे चर्चेत आली होती. आता पुन्हा एकदा ती सोशल मीडियावर तिच्या एका ड्रेसिंग स्टाईलमुळे ट्रोल झालीय. ती लंडनमध्ये तिच्या एका फॅनला भेटली. त्या फॅनसोबतचा हा फोटो पाहून चाहत्यांनी तिला ट्रोल करायला सुरू केले. काहींनी कौतुक केले तर काही म्हणाले,‘एकदा तरी आरशात बघत जा.’

अभिनेत्री दीपिका पादुकोण ही लग्नानंतर तिच्या करिअरबाबत विशेष गंभीरपणे पाहत असल्याचे लक्षात आले आहे. ती ८३ या चित्रपटात कपिल देव यांची पत्नी रोमी देव यांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे सध्या शूटिंगसाठी ती लंडनमध्ये आहे. तिने शॉपिंग करताना तिच्या एका चाहतीसोबत फोटो काढला. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला खरा. पण तो डिप्पीच्या ड्रेसिंग स्टाईलमुळे. तिने कॅमेल टॅन कार्गाे पँटस आणि बाँम्बर जॅकेट घातले आहे. त्या दोघींचा हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर झाला असून या फोटोवर चाहत्यांनी वेगवेगळया कमेंटस केल्या आहेत. काहींनी ‘दीपिका तू खूपच स्टनिंग दिसत आहेस’ म्हणून कमेंट केले. तर काही म्हणाले,‘पती-पत्नीला ड्रेसिंगचा बिल्कुल सेंस नाही’,‘घरातून बाहेर पडताना आरशात बघत जा’ असेही म्हटले आहे.


  


Web Title: Deepika Padukone troll once again
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.