आजपर्यंत एक अभिनेत्री दुस-या अभिनेत्रीची ड्रेसिंग स्टाइल कॉपी करत असल्याचे पाहायला मिळायचे मात्र ‘दीपवीर’ हे एकमेकांचीच ड्रेसिंग स्टाइल कॉपी करताना दिसतायेत. आणि त्यांची ही ड्रेसिंग स्टाइल थोडी अतरंगी असली तरी दोघांच्या स्टाइल सेन्समुळे त्यांना संमिश्र प्रतिक्रीया मिळताना पाहायला मिळतायेत. एक नाही दोन नाही तर पाच वेळा दीपिकाने रणवीर सिंह सारखी स्टाइल केल्याचे फोटो समोर आले आहेत. 

 

त्यामुळे दीपिकाला कोण्या अभिनेत्रीची नाही तर पती  रणवीर सिंहच्या स्टाइल अंदाजाची भुरळ पडल्याचे पहायला मिळत आहे. खरंतर रणवीरचा प्रत्येक अंदाज निराळा पाहायला मिळतोय. तो जे काही करतो तेच तरुणाईचं स्टाइल स्टेटमेंट बनत असल्याचे दिसतंय. त्यामुळे रणवीर सिंहची स्टायलिश अंदाज हा थोडा निराळा असला तरीही इंटरेस्टींग असल्याचे पाहायला मिळतंय.

 

विशेष म्हणजे दीपवीर यांनी त्यांच्या लग्नातही मिळते जुळते स्टाइल लूकचे कपडे परिधान केले होते. त्यामुळे लग्नानंतर रणवीरही वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये हटके स्टाइल लूकमध्ये पाहायला मिळाला. त्याची प्रत्येक स्टाइल त्याच्या चाहत्यांनी डोक्यावर घेतली म्हणून आता दीपिकानेही रणवीरकडून ड्रेसिंग टीप्स घेतल्याचे पाहायला मिळतंय.

खरंतर रणवीर हा दीपिकासाठी खूप पझेसिव्ह असल्याचे वेळोवेळी पाहायला मिळतं.आपल्या लेडी लव्हसाठी रणवीर कशाचीही पर्वा करत नाही. सुरुवातीपासूनच रणवीरचं दीपिकावर जीवापाड प्रेम असल्याचे अनेक वेळा पाहायला मिळते. तुर्तास  ‘दीपवीर’चे सेम टू सेम ड्रेसिंग स्टाइलचे  फोटो पाहून फॅन्ससह बॉलीवुडच्या दिग्गज सेलिब्रिटींनीकडूनही कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव सुरू आहे.  


Web Title: Deepika Padukone Takes Style Tips From Hubby Ranveer Singh
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.