हृतिक-दीपिकाच्या ‘लय भारी’ फोटोवर खिळली चाहत्यांची नजर, मग केली ‘डिमांड’

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2019 11:26 AM2019-12-16T11:26:49+5:302019-12-16T11:28:55+5:30

होय, हृतिक व दीपिकाचा एक सेल्फी सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालतोय.

deepika padukone selfie with hrithik roshan viral fans ask makers to cast them together | हृतिक-दीपिकाच्या ‘लय भारी’ फोटोवर खिळली चाहत्यांची नजर, मग केली ‘डिमांड’

हृतिक-दीपिकाच्या ‘लय भारी’ फोटोवर खिळली चाहत्यांची नजर, मग केली ‘डिमांड’

googlenewsNext
ठळक मुद्देवर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर दीपिका सध्या ‘छपाक’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे.

शनिवारी रात्री म्हणजे गत 14 डिसेंबरला अरमान जैनची ‘रोका सेरेमनी’ झाली. या सोहळ्याला अख्खे कपूर कुटुंब उपस्थित होते. शिवाय बॉलिवूडचे सेलिब्रिटीही हजर होते. या सेरेमनीचे अनेक फोटो व्हायरल झालेत. पण एका फोटोवर चाहत्यांची नजर खिळली. हा फोटो कुणाचा तर हृतिक रोशनदीपिका पादुकोण यांचा. होय, हृतिक व दीपिकाचा एक सेल्फी सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालतोय. हा सेल्फी पाहिल्यांनतर चाहते असे काही उत्साहित झाले आहेत की, त्यांनी या दोघांकडेही एक डिमांड केली. होय, प्लीज एकत्र काम करा ना, अशी ही डिमांड.


दीपिका व हृतिकची जोडी अद्याप कुठल्याही सिनेमात एकत्र दिसलेली नाही. त्यामुळे त्यांचा एकत्र सेल्फी पाहिल्यानंतर या जोडीला एकत्र रूपेरी पडद्यावर पाहण्याची चाहत्यांची इच्छा अनावर झाली आणि त्यांनी या जोडीला एकत्र काम करण्याची गळ घातली. आता चाहत्यांची ही इच्छा निर्माता-दिग्दर्शक किती मनावर घेतात आणि हृतिक व दीपिका कधी एकत्र सिनेमा करतात, ते बघूच.


वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर दीपिका सध्या ‘छपाक’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. या चित्रपटात दीपिका अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडिता लक्ष्मी अग्रवाल हिची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटानंतर ‘83’ या सिनेमातही दीपिका झळकणार आहे. 
हृतिकचे म्हणाल तर याचवर्षी ‘सुपर 30’ व ‘वॉर’ असे त्याचे दोन सिनेमे प्रदर्शित झालेत. या दोन्ही चित्रपटांनी बंपर कमाई केली.

Web Title: deepika padukone selfie with hrithik roshan viral fans ask makers to cast them together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.