ठळक मुद्देदीपवीरच्या जोडीचा एका रोमाँटिक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोयया व्हिडीओत दीपिका आणि रणवीर एकत्र दिसतायेत

बी-टाऊनमधील दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगची जोडी त्यांच्या रोमाँटीक फोटोमुळे सतत चर्चेत असते. गतवर्षी लग्नाच्या बंधनात अडकलेल्या दीपवीरची रोमाँटिक केमिस्ट्री लपून राहिलेली नाही. कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी किंवा सोशल मीडियावर एकमेंकावरील प्रेम व्यक्त करण्याची संधी ही जोडी कधीच सोडत नाही. नुकताच सोशल मीडियावर दीपिका रणवीरला मस्करीत बॅटने मारताना दिसत होती. या दोघांचे या व्हिडिओतील हावभाव त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडले होते.त्यानंतर आता दीपवीरच्या जोडीचा एका रोमाँटिक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.   


या व्हिडीओत दीपिका आणि रणवीर एकत्र दिसतायेत. दीपिका यात रणवीरच्या मांडीवर बसलेली दिसतेय. ऐवढेच नाही तर दीपिका त्याला किस करताना दिसतेय. दीपवीरच्या फॅन्सनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. दीपवीरच्या फॅन्सना हा व्हिडीओ भलताच आवडला आहे. 


वर्कफ्रंट बाबत बोलायचे झाले तर, लवकरच ती मेघना गुलजारच्या छपाकमध्ये दिसणार आहे. तसेच लग्नानंतर ही जोडी पहिल्यांदा स्क्रिनवर एकत्र दिसणार आहे.

दिग्दर्शक कबीर खानच्या '८३' सिनेमात  दीपिका पादुकोणरणवीर सिंगच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. या सिनेमात रोमी देव यांच्या भूमिकेत दिसणार असल्याचे तिने मीडियात सांगितले. सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांना १० एप्रिल २०२० पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.


Web Title: Deepika padukone ranveer singh kissing video viral on social media
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.