नुकतेच आयफा रॉक 2019 या सोहळ्यात दीपवीर त्यांच्या लुक्समुळे सा-यांचेच आकर्षण ठरले होते. या दोघांच्या कमालीचा ड्रेसिंग सेन्स यंदाही सा-यांची वाहवा मिळवून गेला. सध्या या सोहळ्यातले या दोघांचे फोटो खूप व्हायरल होत आहे. ‘दीपवीर’चे फोटो समोर आल्यानंतर फॅन्ससह बॉलीवुडच्या दिग्गज सेलिब्रिटींनीकडूनही कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव सुरू आहे. एकीकडे लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव सुरू असताना दुसरीकडे वेगळीच चर्चा रंगत आहे.  यांत दीपिकाच्या एका फोटोमुळे सोशल मीडियावर ती प्रेग्नंट असल्याच्या चर्चा सुरू आहेत. 


एरव्ही झिरो साईज फिगर आणि फ्लॅट टमीत तिचे फोटो समोर यायचे. मात्र या फोटोत दीपिकाचे पोट दिसत आहे. त्यामुळे नेटीझन्सना हा बेबी बंप असल्याचे वाटतेय. त्यामुळे या फोटोवर  अनेकांनी ती प्रेग्नंट आहे का असा प्रश्न पडल्याचे पाहायला मिळतंय. तुर्तास  दीपिका प्रेग्नंट आहे की नाही हे तर दीपिकाच स्पष्ट करू शकेन. तो पर्यंत जस्ट वेट अँड वॉच.


लवकरच या दोघांच्या लग्नाला वर्षही पूर्ण होणार आहे. गेल्याच वर्षी  १४ नोव्हेंबरला दीपवीर  कोंकणी पद्धतीने तर १५ नोव्हेंबरला सिंधी पद्धतीने दोघांचं लग्न पार पडलं होतं. त्यानंतर मुंबईसह बंगळुरू येथे या दोघांचा ग्रँड रिसेप्शन सोहळा रंगला होता. या सोहळ्याला हिंदी चित्रपटसृष्टीसह मुंबईतील अनेक नामवंत मंडळींनी हजेरी लावली होती.

दीपिका पादुकोणशी लग्न झाल्यापासून रणवीर सिंग अगदी हवेत आहे. बघावे तेव्हा तो दीपिकाची स्तुती करत असतो. दीपिकाचा उल्लेख होणार नाही अशी एकही संधी तो सोडत नाही. मी जगातील सगळ्यांत सुंदर मुलीशी लग्न केले आहे, असे तो म्हणाला. रणवीरची बहीण रितिका भवनानीने दीपवीरसाठी खास डिनर पार्टी अरेंज केली होती. या पार्टीत रणवीरने सगळ्यांदेखत दीपिकाला जगातील सगळ्यांत सुंदर मुलगी म्हटले होते. केवळ इतकेच नाही तर भविष्यात जे काही पुढे येईल, ते तू आणि मी सोबत जगू...असेही तो म्हणाला. त्याचे हे शब्द ऐकून दीपिका लाजून लाजून चूर झाली नसेल तर नवल. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला होता.  या पार्टीत रणवीर सिंग आणि दीपिकाने धम्माल डान्स केला.
 

Web Title: Is Deepika Padukone pregnant?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.