तापसीचा ‘बिगीनी शूट’ व्हिडीओ पाहून दीपिका झाली क्रेजी; म्हणाली, हा यंदाचा बेस्ट परफॉर्मन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2020 02:34 PM2020-12-08T14:34:29+5:302020-12-08T14:36:36+5:30

दीपिकाला आवडला, तुम्ही पाहिलात?

deepika padukone most favourite performance of year was taapsee pannu biggini shoot | तापसीचा ‘बिगीनी शूट’ व्हिडीओ पाहून दीपिका झाली क्रेजी; म्हणाली, हा यंदाचा बेस्ट परफॉर्मन्स

तापसीचा ‘बिगीनी शूट’ व्हिडीओ पाहून दीपिका झाली क्रेजी; म्हणाली, हा यंदाचा बेस्ट परफॉर्मन्स

googlenewsNext
ठळक मुद्देवर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, दीपिका पादुकोण लवकरच ‘83’ या सिनेमात दिसणार आहे.

संगीतकार यशराज मुखाते याने मालिकेतीन संभाषणावर तयार केलेल्या ‘बिगीनी शूट’ रॅप साँगने सध्या बॉलिवूड सेलिब्रिटींना क्रेजी केले आहे. या साँगवर बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटी थिरकताना दिसत आहेत. यापैकीच एक कोण तर तापसी पन्नू. तापसीच्या या डान्स व्हिडीओने चाहत्यांनाच नाही तर चक्क दीपिका पादुकोणलाही वेड लावले. इतके की, तापसीचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर दीपिका तापसीची फॅन झालीये.  
राजीव मसंद यांना दिलेल्या मुलाखतीत दीपिकाने तापसीच्या या डान्स व्हिडीओचे इतके कौतुक केले की, ऐकणाराही हैराण होईल.

‘तापसीचा तो व्हिडीओ म्हणजे, या वर्षातील माझा सर्वात  परफॉर्मन्स आहे. मी तापसीची आधीपासूनच फॅन आहे. पण हा व्हिडीओ पाहिल्यानंतर मी तिची आणखी मोठी फॅन झालीये. 2020 चा बेस्ट परफॉर्मन्स अवार्ड देण्याची जबाबदारी माझ्यावर कोणी सोपवलीच तर मी तो अवार्ड तापसीला देईन,’ असे दीपिका म्हणाली.
 तापसीने हा व्हिडीओ मालदीवमध्ये शूट केला होता. नुकतीच ती बहिणींसोबत मालदीवला व्हॅकेशनवर गेली होती. यादरम्यान तिने ‘बिगिनी शूट’वर डान्स केला होता. यात तापसीचा बॉयफ्रेन्ड मॅथियास बोय याची एक झलकही दिसली होती.

‘बिगीनी शूट’ हा डायलॉग ‘इमोशनल अत्याचार’ या रिअ‍ॅलिटी शोमधील आहे. या शोमध्ये आलेल्या एका स्पर्धक तरूणीने मुलाखतीदरम्यान  उच्चारलेली वाक्य गोळा करुन यशराज  मुखातेने ‘बिगीनी शूट’ या गाण्याची निर्मिती केली. हे गाणे सोशल मीडियावर इतके हिट झाले. बॉलिवूड सेलिब्रिटींनाही या गाण्याने वेड लावले. 
वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, दीपिका पादुकोण लवकरच ‘83’ या सिनेमात दिसणार आहे. याशिवाय शकुन बत्राच्या एका सिनेमातही ती झळकणार आहे. यात ती सिद्धांत चतुर्वेदीसोबत दिसेल. तापसीचे म्हणाल तर सध्या ती ‘रश्मी रॉकेट’ या सिनेमात बिझी आहे.

Web Title: deepika padukone most favourite performance of year was taapsee pannu biggini shoot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.