रणवीर सिंग सोबत असताना देखील दीपिका पादुकोण करतेय या खास व्यक्तीला मिस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 07:52 PM2020-05-15T19:52:45+5:302020-05-15T20:10:31+5:30

ही व्यक्ती दीपिकाच्या आयुष्यात रणवीर इतकीच महत्त्वाची असून तिने या व्यक्तीसोबतचा एक फोटो पोस्ट करत तिला ती मिस करत असल्याचे म्हटले आहे.

Deepika Padukone misses sister Anisha amid lockdown PSC | रणवीर सिंग सोबत असताना देखील दीपिका पादुकोण करतेय या खास व्यक्तीला मिस

रणवीर सिंग सोबत असताना देखील दीपिका पादुकोण करतेय या खास व्यक्तीला मिस

googlenewsNext
ठळक मुद्देदीपिकाने तिच्या बहिणीसोबतचा फोटो पोस्ट करत मी तूला खूपच मिस करत आहे असे लिहिले आहे.

कोरोना लॉकडाऊनमुळे सामान्य लोकांप्रमाणेच सेलिब्रेटी देखील सध्या त्यांच्या घरात कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहेत. चित्रपटांचे चित्रीकरण नसल्यामुळे अनेक सेलिब्रेटी सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असून सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहात आहेत. दीपिका पादुकोण तिचे अनेक फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करत ती एका व्यक्तीला खूप मिस करत असल्याचे म्हटले होते. दीपिकाच्या या फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती.

दीपिका आणि रणीवर सिंग एकत्र असताना दीपिका कोणाला मिस करत आहे हा प्रश्न तुम्हाला पडला असेलच... ही व्यक्ती दीपिकाच्या आयुष्यात रणवीर इतकीच महत्त्वाची असून तिने या व्यक्तीसोबतचा एक फोटो पोस्ट करत तिला ती मिस करत असल्याचे म्हटले आहे.

दीपिकाने तिच्या बहिणीसोबतचा फोटो पोस्ट करत मी तूला खूपच मिस करत आहे असे लिहिले आहे. तिने या फोटोसोबत लिहिलेली कॅप्शन तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. तिने तिच्या बहिणीला शेंगदाणा अशी हाक मारली असून मी तिला खूप मिस करत असून तुझ्यावर उडी मारून मला तुला चेपून टाकायचे आहे असे तिने या कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

दीपिका पादुकोणच्या बहिणीचे नाव अनिषा असून ती दिसायला खूपच सुंदर आहे. ती अनेकवेळा सार्वजनिक कार्यक्रमात दीपिकासोबत उपस्थिती लावते. अनिषा ही गोल्ड प्लेअर असून ती आपल्या देशाचे आंतराराष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व करते.

Web Title: Deepika Padukone misses sister Anisha amid lockdown PSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.