OMG! केवळ नशीब बलवत्तर म्हणून बचावला दीपिका पादुकोणचा ‘हा’ हिरो!!  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 10:23 AM2019-07-24T10:23:00+5:302019-07-24T10:26:30+5:30

अभिनेत्री दीपिका पादुकोणचा हिरो एका अपघातातून थोडक्यात बचावला.

deepika padukone hero hollywood star vin diesel in shock as stuntman fell from 30 feet | OMG! केवळ नशीब बलवत्तर म्हणून बचावला दीपिका पादुकोणचा ‘हा’ हिरो!!  

OMG! केवळ नशीब बलवत्तर म्हणून बचावला दीपिका पादुकोणचा ‘हा’ हिरो!!  

googlenewsNext
ठळक मुद्देविन डिजलच्या ‘एक्सएक्सएक्स- रिटर्न ऑफ जेंडर केज’ या हॉलिवूडपटातून दीपिकाने हॉलिवूड डेब्यू केला होता.

दीपिका पादुकोणचा हिरो एका अपघातातून थोडक्यात बचावला. आम्ही बोलतोय ते हॉलिवूड सुपरस्टार विन डीजल याच्याबद्दल. ‘एक्सएक्सएक्स- रिटर्न ऑफ जेंडर केज’ या हॉलिवूड चित्रपटात दीपिका विन डिजलसोबत झळकली होती. हाच विन डिजल एका स्टंट सीनच्या शूटींगदरम्यान अगदी सुदैवाने बचावला.
विन सध्या ‘फास्ट अ‍ॅण्ड फ्युरियस 9’ या चित्रपटाच्या शूटींगमध्ये बिझी आहे. याच चित्रपटाच्या एका अ‍ॅक्शन सीनच्या शूटींगदरम्यान हा गंभीर अपघात घडला.

यात 30 फुट उंचीवरून एक स्टंट करायचा होता. मात्र या सीनसाठी विनच्या जागी बॉडी डबलचा वापर करण्यात आला. पण विनचा बॉडी डबल हा स्टंट करताना गंभीर जखमी झाला. विनच्या डोळ्यादेखत हा स्टंटमॅन बाल्कनीतून 30 फुट खाली पडला. इतक्या उंचीवरून पडल्याने स्टंटमॅनच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. सध्या हा स्टंटमॅन कोमात आहे. स्टंट करत असताना त्याची सेफ्टी केबल तुटली आणि तो खाली पडला, असे कळतेय. अपघात घडला तेव्हा विन त्याठिकाणी हजर होता. या स्टंटमॅनच्या जागी विन असता तर कदाचित त्याच्या जीवावर बेतू शकले असते. या घटनेनंतर विनला जबर धक्का बसला आहे. स्टंटमॅनला रक्ताच्या थारोळ्यात पाहून विन स्वत:चे अश्रू रोखू शकला नाही.

अपघातात जखमी झालेल्या स्टंटमॅनचे नाव जो आहे. त्याच्या गर्लफ्रेन्डने फेसबुकवर या अपघातातबद्दल लिहिले आहे.  त्याच्या डोक्याला खूप गंभीर दुखापत झाली आहे.  तो सध्या कोमामध्ये आहे. त्याची प्रकृती सध्या स्थिर असून त्याला डॉक्टर्सच्या देखरेखेखाली ठेवण्यात आले आहे. माझे त्याच्यावर खूप प्रेम आहे. तो लवकरात लवकर  बरा होईल, अशी आशा करते, असे तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

विन डिजलच्या ‘एक्सएक्सएक्स- रिटर्न ऑफ जेंडर केज’ या हॉलिवूडपटातून दीपिकाने हॉलिवूड डेब्यू केला होता. या चित्रपटाला म्हणावे तसे यश मिळाले नाही. पण यातून दीपिकाने केलेला डेब्यू मात्र चांगलाच यशस्वी ठरला होता. या चित्रपटाने हॉलिवूडमध्ये तिला वेगळी ओळख निर्माण करता आली. 

Web Title: deepika padukone hero hollywood star vin diesel in shock as stuntman fell from 30 feet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.