Deepika padukone drugs chat actress called husban ranveer singh her super drug | जेव्हा दीपिका पादुकोण पती रणवीर सिंगला म्हणते- तू माझा सुपरड्रग्स, सोशल मीडियावर 'ती' पोस्ट व्हायरल

जेव्हा दीपिका पादुकोण पती रणवीर सिंगला म्हणते- तू माझा सुपरड्रग्स, सोशल मीडियावर 'ती' पोस्ट व्हायरल

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात ड्रग्स अँगलसमोर आल्यानंतर एनसीबीची टीम आता बॉलिवूडमध्ये ड्रग्स देणारी संपूर्ण साखळी तोडण्याचा प्रयत्न करीत आहे. एनसीबीच्या चौकशीत अभिनेत्री दीपिका पादुकोणचेही नाव समोर आले आहे.


जुनी पोस्ट व्हायरल
ड्रग्स अँगलमध्ये दीपिकाचे नाव समोर आल्यानंतर तिला सोशल मीडियावर वाईट पद्धतीने ट्रोल करण्यात आले आहे. कंगनानेही दीपिकावर निशाणा साधला आहे. ड्रग्स प्रकरणात दीपिकाचे नाव समोर आल्यानंतर तिची जुनी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होते आहे ज्यात ती रणवीर सिंगला तिचा सुपर ड्रग्स म्हणतेय. ही पोस्ट दीपिकाने नोव्हेंबर 2019मध्ये रणवीर सिंगचा फोटो शेअर करत केलीय. या फोटोमध्ये रणवीर सिंगच्या टी-शर्टवर मागच्या बाजूला लिहिले आहे,  Love is a Super Power. याचा अर्थ प्रेम ही एक सुपर पॉवर आहे. या फोटोसोबत कॅप्शनमध्ये दीपिकाने लिहिले, आणि तू माझ्या सुपर ड्रग्स आहे. 


असा झाला दीपिकाच्या नावाचा खुलासा
आज तकने एनसीबीच्या अधिका-यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, सुशांत सिंग राजपूतची टॅलेंट मॅनेजर जया शाहच्या एका कथित चॅट मध्ये ‘डी’ आणि ‘के’ या इंग्रजी आद्याक्षरांचा उल्लेख आहे. एनसीबीच्या सुत्रांच्या माहितीनुसार डी’चा अर्थ दीपिका पादुकोण आणि ‘के’चा अर्थ करिश्मा (जया शाहची सहकारी).
एनसीबीच्या ड्रग्ज प्रकरणाच्या चौकशीत डी, एन, एस, के अशी नावे समोर आली आहे. यात डीचा अर्थ दीपिका पादुकोण, एन म्हणजे नम्रता शिरोडकर, एस म्हणजे श्रद्धा कपूर आणि के म्हणजे करिश्मा यांची नावे समोर आली आहेत. एनसीबीच्या हाती काही व्हाट्सअ‍ॅप चॅट लागले आहेत. यात दीपिका व करिश्मा ड्रग्जबद्दल बोलत आहेत. तुझ्याजवळ माल आहे का? असे दीपिका यात करिश्माला विचारते. यावर हो, पण घरी आहे. मी सध्या वांद्रयात आहे, असे उत्तर करिश्मा देते.

 

Drugs case: दीपिका व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये विचारते, 'माल आहे का?' Hash ना?, गांजा नाही, वाचा पूर्ण चॅट

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Deepika padukone drugs chat actress called husban ranveer singh her super drug

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.