कुणी तरी येणार येणार गं, दीपिका आणि रणवीरच्या येणार नवा पाहुणा ?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2019 10:48 AM2019-08-17T10:48:24+5:302019-08-17T10:48:49+5:30

बी-टाऊनमधील दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगची जोडी त्यांच्या रोमाँटीक फोटोमुळे सतत चर्चेत असते. दीपवीरची रोमाँटिक केमिस्ट्री लपून राहिलेली नाही

Deepika padukone called ranveer singh daddie during insta live | कुणी तरी येणार येणार गं, दीपिका आणि रणवीरच्या येणार नवा पाहुणा ?

कुणी तरी येणार येणार गं, दीपिका आणि रणवीरच्या येणार नवा पाहुणा ?

googlenewsNext

बी-टाऊनमधील दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगची जोडी त्यांच्या रोमाँटीक फोटोमुळे सतत चर्चेत असते. दीपवीरची रोमाँटिक केमिस्ट्री लपून राहिलेली नाही. कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी किंवा सोशल मीडियावर एकमेंकावरील प्रेम व्यक्त करण्याची संधी ही जोडी कधीच सोडत नाही.

रणवीर सिंगने आपल्या फॅन्सासाठी लाईव्ह सेशन केले. रणवीरच्या फॅन्सने यावर कमेंट द्यायला सुरुवात केली. मात्र सगळ्यांचे लक्ष वेधले ते दीपिका पादुकोणच्या कमेंटने. दीपिकाच्या कमेंटने सगळे फॅन्स चकित झाले आहेत. 


दीपिकाने रणवीरच्या लाईव्ह व्हिडीओमध्ये कमेंट करताना लिहिले आहे की, ''हाय डॅडी.'' दीपिकाच्या या कमेंटमुळे तिच्या नुकताच झालेल्या कान्सचा आठवण झाली. कान्स 2019चे फोटो पाहून दीपिका पादुकोण प्रेग्नेंट असल्याचा अंदाज तिच्या फॅन्सनी लावला होता. मात्र त्यावेळी तिने या गोष्टी अफवा असल्याचे सांगत सगळ्याचे खंडन केले होते. असे जरी असले तरी रणवीरच्या लाईव्हवर अर्जुन कपूरने केलेली कमेंटदेखील इग्नोर करु शकत नाहीय. दीपिकानंतर अर्जुन कपूरने लिहिले, Baba Bhabi gonna give u one.


सध्या रणवीर आणि दीपिका लंडनमध्ये आहेत. दोघे तिथे  ८३ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. या चित्रपटात दीपिका पादुकोण कपिल देव यांची पत्नी रोमी देव यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात काम करण्याविषयी तिने सांगितले होते की, '८३' मध्ये कपिल देव यांची भूमिका रणवीर सिंगशिवाय दुसरा कुणी अभिनेता साकारत असता तरी देखील मी या चित्रपटात काम केले असते.

लग्नानंतर दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगचा हा पहिला सिनेमा आहे. '८३' हा सिनेमा भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा असून १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकला होता. पुढच्या वर्षी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर दीपिका छपाक चित्रपटातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण करते आहे.

Web Title: Deepika padukone called ranveer singh daddie during insta live

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.