ठळक मुद्देमेट गालामध्ये ही तिच्या सौंदर्याची चर्चा झाली

आपल्या अभिनयाच्या जोरावर रसिकांच्या मनात तिेने आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आता तर तिने  जगातील सर्वात सुंदर महिलांच्या यादीत वरचं स्थान पटकावलं आहे. आम्ही बोलतोय, बॉलिवूडच्या मस्तानीबद्दल म्हणजे अर्थात दीपिका पादुकोणबदल. दीपिकासोबतच स्कारलेट जॉनसन, एंजोलिना जॉली, ब्लेक लाइवली, हाले बेरी, बेयोंसे, एम्मा वॉटसन यांची नावं ही या यादीत सामील आहेत. 


मेट गालामध्ये ही दीपिकाच्या कपड्यां इतकीचे तिच्या सौंदर्याची चर्चा झाली. गतवर्षी दीपिका रणवीर सिंगसोबत लग्नाच्या बेडीत अडकली. लग्नानंतर ती पहिल्यांदाच रणवीर सिंगसोबत '८३'मध्ये स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.  '८३' हा सिनेमा भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा आहे. १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकला होता. सध्या या सिनेमाची टीम लंडनला शूटिंग करतेय.


नुकतंच दीपिकाने छपाक सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले आहे.  दीपिका पादुकोण छपाक चित्रपटातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण करते आहे. या चित्रपटात अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अग्रवाल हिच्या संघर्षाची आणि खडतर प्रवासाची कथा रेखाटण्यात आली आहे. यात लक्ष्मीच्या भूमिकेत दीपिका पादुकोण दिसणार आहे.

 तर विक्रांत लक्ष्मीचा लिव्ह इन पार्टनर आलोक दीक्षितच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. विक्रांत आणि दीपिकाची केमिस्ट्री रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना कितपत भावते, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे. हा सिनेमा १० जानेवारी २०२०ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


Web Title: Deepika padukone become most beautiful woman in the world
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.